पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस चौथा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस चौथा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

१) शिक्षकांनी स्वतः शिकवलेली गाणी, कविता विद्यार्थ्यांकडून साभिनय म्हणवून घ्याव्यात. सुरुवातीस शिक्षकांनी गाण्याच्या ओळी स्वतः सांगाव्यात आणि विद्यार्थ्यांना मागे म्हणण्यास सांगावे. नंतर समूहात, गटात, वैयक्तिक म्हणवून घ्याव्यात.

२) मुलांचे गाण्यातील शब्दांचे उच्चार, शब्दफेक याकडे लक्ष वेधून घ्यावे.

३) उदा. अग्गोबाई ढग्गोबाई गाणे.

संदर्भ – बडबडगीते, गाणी, कविता यांचा संग्रह, स्वयं अध्ययन उपक्रम आणि साहित्य शिक्षक हस्तपुस्तिका – इयत्ता पहिली विषय -मराठी हे वापरता येईल.

सक्षम बनू या :-शिक्षकांनी स्वतः गीत गायन कसे करावे हे प्रत्यक्ष करून दाखवावे. उदा. एक होते झुरळ चालत होते सरळ, ससा, ससा दिसतो कसा विद्यार्थ्यांच्या शब्द उच्चाराकडे, त्यांची चाल, लय याकडे लक्ष केंद्रित करणे. चित्र, शब्द सराव उदा. झुरळ, बस, ससा, कापूस.

कल्पक होऊया :

• विद्यार्थ्यांच्या परिचयातील गाणी, कविता म्हणवून घ्या.

१) बोकोबा, बोकोबा 

२) वाघाची मावशी यासारखे गाणी शोधा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

Teacher tells the sound of any letter from the alphabet and asks students to stand up if their names start from the same sound. Likewise the activity will be continued.