reliance jio : जिओची ऑफर, युजर्संना फ्रीमध्ये २ जीबी अतिरिक्त डेटा – reliance jio special offer users get daily extra 2gb data with 4 days

[ad_1]

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या युजर्संना फायदा पोहोचवण्यासाठी लागोपाठ नवीन-नवीन प्लान आणत आहे. आता पुन्हा एकदा जिओने ‘Jio Data Pack‘ला लाँच केले आहे. या पॅक अंतर्गत ग्राहकांना चार दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा अतिरिक्त मिळणार आहे. कंपनीने या पॅकला पहिल्यांदा मार्च २०२० मध्ये लाँच केले होते. या महिन्याच्या अखेरपर्यंत युजर्संच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करणे सुरू केले आहे.

वाचाः
‘वनप्लस ८’ सीरिजची भारतात प्री बुकिंग सुरू

जिओ डेटा पॅकची माहिती मीडिया रिपोर्टनुसार, जिओने २७ एप्रिलपासून आपल्या युजर्संना जिओ डेटा पॅक देणे सुरू केले आहे. युजर्संना या पॅकमध्ये चार दिवसांच्या वैधतेसह दररोज २ जीबी डेटा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, युजर्संना यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

वाचाः
शाओमीचा Mi10 यूथ एडिशन लाँच, पाहा किंमत

माय जिओ अॅपमध्ये जावून चेक करा

कंपनीने या प्लानला काही निवडक युजर्संसाठी लाँच केले आहे. जर तुम्हाला ही ऑफर मिळाली की नाही, हे चेक करण्यासाठी तुम्हाला माय जिओ अॅप मध्ये जावून डेटा पॅक चेक करावा लागेल.

पाहाः
टाटा स्कायची ‘ऑफर’; २ महिने फ्री पाहा टीव्ही

२०१७ मध्ये अशीच ऑफर आणली होती

जिओने २०१७ मध्ये सुद्धा अशीच एक ऑफर आणली होती. जिओला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त जिओने युजर्सला या प्लान अंतर्गत २ जीबी डेटा दिला होता. या प्लानमध्ये तीन महिन्यांपर्यंत युजर्संना अतिरिक्त ८ जीबी डेटा दिला होता.

वाचाः
‘करोना वॉरियर्स’साठी सॅमसंग-गुगलची फ्री सेवा


रिलायन्स जिओचा २४९ रुपयांचा प्लान


युजर्संना या प्लानमध्ये १०० एसएमएस सह २ जीबी डेटा दररोज मिळणार आहे. तसेच कंपनी युजर्संना १ हजार नॉन जिओ मिनिट देत आहे. युजर्संना प्रीमियम अॅप्सचा वापर करता येवू शकतो. या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे.

वाचाः
मोबाइल विकताना तुम्ही पण ‘या’ चुका करतात?



[ad_2]

Source link

Leave a comment