[ad_1]
जिओने New Year 2020 offer बंद केली आहे. आता नवीन प्लान लाँच केली असून याची किंमत २ हजार १२१ रुपये आहे. जिओच्या या प्लानमध्ये सर्व सुविधा मिळणार जी आधीच्या न्यू इयर २०२० मध्ये मिळत होती. परंतु, नव्या प्लानची वैधता कमी करण्यात आली आहे. जिओच्या २,१२१ रुपयांच्या प्लानमध्ये ३३६ दिवसांची वैधता असून युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी प्रतिदिन डेटा, मोफत एसएमएस आणि जिओ अॅप्सचे अॅक्सेस मिळणार आहे. दरम्यान, अनलिमिटेड कॉलिंग केवळ जिओच्या नेटवर्कवर उपलब्ध आहे. अन्य दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी या प्लानमध्ये एकूण १२,००० मिनिट्स मिळणार आहे. या प्लानमध्ये एकूण ५०४ जीबी डेटा मिळणार आहे.
दैनंदिन डेटा संपल्यानंतर युजर्सला 64Kbps ची स्पीड मिळणार आहे. या स्पीडवर फेसबुक मॅसेंजर आणि व्हॉट्सअॅपचा वापर करता येऊ शकतो. फ्री अॅक्सेसमध्ये जिओ टीव्हीसोबत जिओ चित्रपट मिळणार आहे. जिओ टीव्हीवर ६५० हून अधिक चॅनेल पाहू शकता. जिओच्या या नव्या प्लानचा सामना एअरटेलच्या २, ३९८ रुपये आणि व्होडाफोनचा २,३९९ रुपयांच्या प्लानसोबत होणार आहे. एअरटेलच्या या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते. तसेच दररोज १.५ जीबी डेटा मिळतो.
पालकांना धडकी भरवणारं Tik Tok चं नवं चॅलेंज
[ad_2]
Source link