[ad_1]
Tecno Camon 15 ची किंमत ९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन गोल्ड, पर्पल आणि डार्क झेड या तीन रंगात उपलब्ध करण्यात येणार आहे. तर Tecno Camon 15 Pro ची किंमत १४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. आइस झेडाइट आणि ओपल व्हाइट या दोन रंगात हे फोन उपलब्ध होणार आहेत. सुरुवातीला Tecno Camon pro खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३ हजार ४९९ रुपयांचा स्पीकर देण्यात येणार आहे.
Tecno Camon 15 ची खास वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.५५ इंचाचा डॉट इन पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ४ जीबी रॅम प्सस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. चार्जिंगसाठी ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात फेस अनलॉकसह फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी रियरमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि पोर्ट्रेट शॉट्ससाठी QVGA डेप्थ सेसिंग लेन्स देण्यात आली आहे. सुपर नाइट शॉट लेन्स देण्यात आले आहेत. फ्रंटमध्ये पंच होल कट आउट सह १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
Tecno Camon 15 Pro ची खास वैशिष्ट्ये
या फोनमध्ये २३४०X१०८० रिझॉल्यूशन पिक्सलसह FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. 2.35Ghz ऑक्टा-कोर P35 प्रोसेसर देण्यात आला आहे. चार्जिंगसाठी ४००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्नॅकर आणि फेस अनलॉकिंग सिस्टम देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी रियरमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल दिला आहे. ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, QVGA डेप्थ सेंसिंग लेन्स, f/1.79 अपर्चर वाला नाइट शॉट लेन्स देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे.
जिओः स्वस्त प्लान बंद, आता जास्त पैसे मोजा
[ad_2]
Source link