भारतातील पहिला 5G स्मार्टफोन येत्या 24 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. स्मार्टफोन तयार करणारी चीनमधील ‘Realme’ या कंपनीने या 5G स्मार्टफोनच्या लाँचिंगची पूर्ण तयारी केली आहे. कंपनीच्या अधिकृत सुत्रांच्या माहितीनुसार, या स्मार्टफोनची किंमत जवळपास 50 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, “मोबाईलच्या क्षेत्रात 2018 मध्ये पाऊल टाकणारी कंपनी येत्या 24 फेब्रुवारीला भारतात पहिला 5 जी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, सध्या देशात 5 जीचे नेटवर्क नाही आहे.” ‘Realme’चा हा स्मार्टफोन 865 स्नॅपड्रॅगन चिपसेटसोबत मार्केटमध्ये येणार आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत जवळपास 50 हजार रुपये असणार आहे,
मोबाईल फोन्सची तुलना करणारी एक वेबसाइटचा अंदाज आहे की, कमी चिपसेट आवृत्तीसोबत 5 जी स्मार्टफोनची किंमत 25,790 रुपये प्रति युनिटवर उपलब्ध होऊ शकते. कंपनी भविष्यातील दृष्टीकोण पाहून उत्पादन करू इच्छिते. ज्यामुळे जगाभरातील लोक याचा वापर करू शकतील. या स्मार्टफोनची टेकनिक जगभरातील जवळपास प्रत्येक विकसित देशात उपलब्ध आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
Realme’द्वारे एक्स 50 प्रो 5 जी स्मार्टफोन भारत आणि स्पेनमध्ये लाँच करण्यात येईल. याचबरोबर, चीनमधील एक नवीन स्मार्टफोन ब्रांड iQOO 3 सुद्धा 25 फेब्रुवारीला आपल्या 5 जी स्मार्टफोनची घोषणा करण्याची शक्यता आहे.
माहिती Share करा
Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook