realme narzo 10: रियलमीची ‘नार्जो सीरिज’ आज भारतात लाँच होणार – realme narzo 10, narzo 10a launching in india today: how to watch livestream

[ad_1]

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमी नार्जो सीरिज अंतर्गत स्मार्टफोन आज भारतात लाँच करणार आहे. कंपनी या सीरिज अंतर्गत Narzo 10 आणि Narzo 10A दोन स्मार्टफोन भारतात आज लाँच करणार आहे.आज दुपारी १२.३० वाजता या स्मार्टफोनची ऑनलाइन लाँचिंग करण्यात येणार आहे. याआधी हे फोन २६ एप्रिल रोजी लाँच करण्यात येणार होते. परंतु, भारतात लॉकडाऊन सुरू असल्याने लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती.

वाचाःजिओ युजर्संना झटका, प्रसिद्ध डेटा व्हाउचर बंद

रियलमीची ही लॉचिंग ऑनलाइन होणार आहे. आज दुपारी साडे बारा वाजता युजर्संना रियलमी इंडियाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा कार्यक्रम लाइव्ह पाहता येवू शकतो. कंपनीने नवीन नार्जो सीरिजसाठी रियलमीची नजर स्मार्टफोन वापरणाऱ्या तरुण वर्गावर आहे. नार्जो १० मध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा मॉड्यूल देण्यात येणार असल्याची माहिती आहे. रियर पॅनलवर एक व्हर्टिकल कॅमेरा सेटअप असणार आहे. नार्जो १० ए मध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरीसह फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात येणार आहे. फोनमध्ये एक ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात येणार आहे.

वाचाः …तर देशभरात स्वस्तात मिळणार करोना व्हायरसचे औषध

नार्जो सीरिजच्या दोन्ही फोनमध्ये ब्लूटूथ ५, जीपीएस, नैविक, ड्यूअल सीम ४जी, व्हीओएलटीई, यूएसबी टाइप सी, ३.५ एमएम हेडफोन जॅक यासारखे फीचर देण्यात येणार आहेत.

वाचाःलॉकडाऊनः जिओचा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लान लाँच

वाचाः लॉकडाऊनमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च काय केले?

वाचाः ‘रेडमी नोट ९ प्रो’च्या जाहीरातीत अणूबॉम्ब; शाओमीची माफी

[ad_2]

Source link

Leave a comment