Nokiaचा ५५ इंची स्मार्ट टीव्ही; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

[ad_1]

नवी दिल्ली : नोकिया कंपनीचा ५५ इंची स्मार्ट टीव्ही आज म्हणजेच २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. Nokia Smart TV फ्लिपकार्टवर खरेदी करता येऊ शकतो. Nokiaने डिसेंबर २०१९ मध्ये भारतात ५५ इंची 4K स्मार्ट टीव्ही लॉन्च केला होता. Nokiaने या स्मार्ट टीव्हीमध्ये जबरदस्त साऊंडसाठी JBL ऑडिओ टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. ज्यात साऊंड आऊटपुटसाठी 24W स्पीकर देण्यात आले आहेत. 

Nokiaच्या ५५ इंची  4K Smart TVची किंमत ४१,९९९ रुपये इतकी आहे. या स्मार्ट टीव्हीवर HSBC डेबिट/ क्रेडिट कार्ड आणि Axis Bank Buzz Credit वर १० टक्के डिस्काऊंट मिळत आहे. कंपनी या स्मार्ट टीव्हीसह एक वर्षाची वॉरंटी ऑफर करतेय. त्याशिवाय २,९९९ रुपयांत ३ वर्षांच्या वॉरंटीचीही ऑफर आहे.

Nokia 4K TVमध्ये PureX क्वार्ड-कोर प्रोसेसर देण्यात आलाय. या टीव्हीमध्ये २.२५ जीबी रॅम आहे. ५ इंची Nokia Smart TV मध्ये यूजर्सला Intelligent Dimming टेक्नोलॉजी, Dolby Vision आणि HDR 10 या सुविधा मिळतात. या टीव्हीमध्ये ब्राइटर, शार्पर आणि विविड कलर असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. Dolby Audio, Dolby Digital आणि DTS TruSurround टेक्नोलॉजी लॉन्च करण्यात आली आहे. या टीव्हीच्या बॉटममध्ये जबरदस्त JBL स्पीकर देण्यात आले आहेत. 

नोकियाच्या पहिल्या स्मार्ट टीव्हीच्या या टीव्हीमध्ये, क्लियर व्ह्यू टेक्नॉलॉजी आणि क्लीयर साउंड टेक्नॉलॉजीचा सपोर्ट देण्यात आलाय. यासह, यात Google Voice Assistant आणि Netflix आणि YouTube साठी खास बटणंही देण्यात आली आहेत.



[ad_2]

Source link

Leave a comment