♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

Mi Electric Toothbrush: शाओमीचा इलेक्ट्रिक टूथब्रश भारतात लाँच, ३० दिवसांची बॅटरी लाईफ – xiaomi launches mi electric toothbrush t100 with 30-day battery life at rs 549

[ad_1]

नवी दिल्लीः शाओमीने आपला आणखी एक इलेक्ट्रिक टूथब्रश भारतात लाँच केला आहे. चीनी कंपनीने जवळपास तीन महिन्यांपूर्वी Mi Electric Toothbrush T300 टूथब्रश भारतात लाँच केला होता. आता लेटेस्ट Mi Electric Toothbrush T100 लाँच केला असून हा आधीच्या तुलनेत जास्त पॉकेट फ्रेंडली आहे. यात अल्ट्रा सॉफ्ट ब्रिस्टल, लो-नॉइज डिझाईन आणि ३० दिवसांची बॅटरी लाईफ मिळते. मी इलेक्ट्रिक टूथब्रश टी100 ची डिझाईन स्लीक आणि सिंगल कलर मध्ये येतो. हे टूथब्रश डॉक्टरांच्या सल्ल्याने तयार केल्याचा दावा शाओमी कंपनीने केला आहे.

वाचाः SBI ग्राहकांना अलर्ट, चुकूनही फोनमध्ये हे App ठेवू नका

Mi Electric Toothbrush T100: ची किंमत

मी इलेक्ट्रिक टूथब्रश टी १०० आता क्राउडफंडिंग अंतर्गत मी डॉट कॉम वर उपलब्ध आहे. याची किंमत ५४९ रुपये आहे. या टूथब्रशची किंमत १५ जुलैपासून सुरू होणार आहे. शाओमीने आता ब्रश हेड्सच्या उपलब्धतेबद्दल काहीही माहिती दिली नाही. या टूथब्रशची टक्कर ओरल बी आणि कोलगेटच्या इलेक्ट्रिक टूथब्रश शी होईल. ओरल-बी क्रॉसऐक्शन बॅटरी टूथब्रश ची किंमत ३५९ रुपये आहे. तर कोलगेट ३६० चारकोल बॅटरी टूथब्रशची किंमत ५९९ रुपये आहे.

Mi Electric Toothbrush T100: ची वैशिष्ट्ये
या टूथब्रशमध्ये ड्यूल प्रो ब्रश मोड देण्यात आले आहेत. हे इक्विक्लीन ऑटो टायमरसोबत येतो. हे युजरचे दात स्वच्छ करण्यास मदत करते. हे युजरला ३० सेकंदानंतर एकाचवेळी किती वेळ खर्च करायचा याची माहिती देते. या टूथब्रशमध्ये दोन मोड स्टँडर्ड आणि जेंटल देण्यात आले आहे. या ब्रशची डिझाईन अल्ट्रा सॉफ्ट आहे.

शाओमीचा दावा आहे की, इलेक्ट्रिक टूथब्रश टी १०० मध्ये ३० दिवसांची बॅटरी दिली आहे. हे टूथब्रश फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, यात बॅटरी स्टेट्स सांगण्यासाठी यात एक एलईडी इंडिकेटर आहे. इलेक्ट्रिक टूथब्रश IPX7 रेटिंग सोबत येतो. पाण्यात असूनही ते खराब होत नाही. या टूथब्रशचे वजन ४६ ग्रॅम आहे.

वाचाःतुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप्स आहेत का?, चेक करुन तात्काळ डिलीट करा

वाचाः सॅमसंग Galaxy M11, Galaxy M01ची विक्री सुरू, जाणून घ्या किंमत

[ad_2]

Source link