इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 40
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास
सोडवून पाहू….
योग्य पर्याय निवड व चौकटीत लिही.
१. शिवांशने शर्ट शिवण्यासाठी २ मीटर ४० सेंटीमीटर कापड दुकानातून आणले तर त्याने किती सेंटीमीटर कापड आणले ?
१) २४०० सेमी २) २४० सेमी ३) २४ सेमी ४) २४० मी
२. एका भांड्यात ५० मिली पाणी आहे ५ मिली च्या मापाने बादलीतून सर्व पाणी बाहेर काढायचे असल्यास किती वेळा पाणी बाहेर काढावे लागेल ?
१) दहा
२)पाच
३)पन्नास
४)एक
३. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ते ओळख.
१) ५१२ सेंटीमीटर मध्ये ५०० सेमी व १२ सेमी आहे.
२) ५१२ सेंटीमीटर मध्ये ५ मीटर व १२ सेमी आहे.
३) ५१२ सेंटीमीटर मध्ये ४०० सेमी व १०० सेमी व १२ सेमी आहे.
४) ५१२ सेंटीमीटर मध्ये ५ किलोमीटर १२ सेमी आहे.