इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 27

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 27

विषय  – गणित आजचा सेतू अभ्यास


खालील माहिती वाचा व समजून घ्या 

संबोध कोपरा

तू आतापर्यंत बऱ्याच वेळा आपल्या शरीराच्या अवयवांचा उपयोग करून लांबी मोजली असेल किंवा मोजताना पहिली असेल. त्याचे किमान दोन फायदे व दोन तोटे लिही.

तू घरी, शाळेत किंवा परिसरात प्रमाणित साधनांच्या / एककांच्या सहाय्याने सुधा लांबी मोजली असेल किंवा मोजताना पहिली असेल. त्याचे दोन फायदे व दोन तोटे लिही,

प्रमाणित एककामध्ये सर्वमान्य एकक आहेत- सेंटीमीटर मीटर व किलोमीटर. काही वेळा तू इंच फुट ही एकके सुद्धा ऐकतो. 7

१०० सेंटीमीटर= 1 मीटर

सराव कोपरा

तू घरी किंवा शाळेत किंवा परिसरात कोण कोणत्या वस्तूंची किंवा बाबींची लांबी मोजत असताना पाहिले आहे? किमान 5 उदाहरणे नोंदव, लांबी मोजण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा उपयोग तुझ्यासमोर करण्यात आला होता, त्यांची नावे लिही.

● लांबी मोजण्याच्या संदर्भाने तू आजपर्यंत वापरलेल्या आणि ऐकलेल्या सर्व शब्दांची यादी तयार कर.

● कृती क्रमांक १) घरातील एक टॉवेल घे, तो जमिनीवर अंथरून त्याची लांबी तुझ्या वितीने मोज आणि नौद कर. त्यानंतर त्याच टॉवेल ची लांबी आईला किंवा बाबांना त्यांच्या वितीने मोजण्याची विनंती कर व किती विती भरते याची नोंद कर. आलेल्या नोंदी ये निरीक्षण करून काय निष्कर्ष निघाला याची वहीमध्ये नोंद घे.

आपण जर कापड दुकानदाराकडून वितीने मोजून कापड विकत घेतले तर काय होईल ?

● तुमच्याकडे असलेल्या तुझ्याकडे असलेल्या पुस्तकाची वहीची लांबी आणि रुंदी मोजपट्टी च्या साहाय्याने मोज व लिही.

घरातील चटई, बैठक स्म, टॉवेल, हात रुमाल इत्यादी लांबी रुंदी मोज व वहीमध्ये नोंद कर

तू वही ची लांबी कशाने मोजणार ?

तुझी उंची किती आहे मोजून लिही.

घरापासून ते जवळच्या किराणा दुकानापर्यंतचे अंतर मोजण्यासाठी कोणते साधन वापरशील ?

सोडवून / करून पाहू…

• तुटलेल्या मोजपट्टी च्या साह्याने पेन ची लांबी मोजण्याची कृती लिही.

● आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सहाय्याने, खालील परिमाणात कोण कोणत्या वस्तू / बाबी मोजतात त्यांची यादी तयार कर.

१) सेंटीमीटर मध्ये = ……………………….

२) मीटर मध्ये. =   ……………………….

३) किलोमीटर मध्ये = ……………………….

टाकाऊ वस्तूपासून १ मीटर मापाचे साधन बनव. 


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी




1 thought on “इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 27”

Leave a comment