इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 23

इ   8 वी  सेतू अभ्यास दिवस  23

विषय  – मराठी 

 वाक्य आणि वाक्याचे प्रकार  भाग 2 

याशिवाय वाक्याचे आणखी काही प्रकार असतात हे शिक्षकांनी विदयार्थ्यांना खालीलप्रमाणे

केवलवाक्य केवल वाक्यात एकच विधान असते. त्यामुळे यामध्ये एकच उद्देश्य आणि एकच विधेय असते.

केवलवाक्य हे आज्ञार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यांपैकी कोणत्याही प्रकारातील असू शकते. उदा.

> मी रोज सूर्यनमस्कार करते.

> तुला बागकाम आवडते का?

> मकरंद, लिहिलेला निबंध वाच. तू

मिश्र वाक्य मिश्र वाक्यांत दोन किंवा अधिक वाक्ये असतात, जी एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य ‘मुख्य वाक्य’ असते, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौण वाक्य असते. उदा.

● जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बागेत जाईल.

★ आकाशात ढंग जमले की मोर नाचू लागतात..

> नियमित अभ्यास केला तर परीक्षेच्यावेळी गडबड होत नाही.

कधी कधी एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्ये अवलंबून असतात. ही गौण

वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडलेली असतात.

संयुक्त वाक्य संयुक्त वाक्यांत दोन वाक्ये असतात. ती दोन वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी – जोडलेली असतात; पण ती स्वतंत्र असतात. म्हणजे ती दोन केवलवाक्ये असतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवर अवलंबून नसतात. यालाच जोडवाक्य असेही म्हणतात.

> रईसा रोज सकाळी घरकामात मदत करते आणि सायंकाळी अभ्यास करते.

→ तिने घडलेल्या सर्व घटना सांगितल्या; परंतु तरीही त्यांचे समाधान झाले नाही.

सराव करू या!

वाक्यांचे प्रकार ओळखा.

१. पाऊस आला की शेतकरी पेरणीला लागतो.
२. मंदा खो खो खेळेल किंवा समूहगीतामध्ये भाग घेईल.
3. माझे बोलून झाले की मग तू बोल.
४. जेवढी भूक लागते तेवढेच खाणे म्हणजे प्रकृती.
५. आपल्या जेवणातील दोन घास भुकेलेल्यांना खाऊ घालावेत.



1 thought on “इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 23”

Leave a comment