इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 23
विषय – गणित



सराव कोपरा
खालील उदाहरणे अभ्यास आणि त्यावरून दिलेल्या राशींमध्ये समप्रमाण आहे की व्यस्तप्रमाण हे लक्षात घे.
1) गाडीमध्ये टाकलेले पेट्रोल व प्रतिलीटर पेट्रोलमध्ये गाडीने कापलेले अंतर- समप्रमाण (कारण जेवढे पेट्रोल जास्त तेवढे प्रतिलीटर कापले जाणारे अंतर जास्त.)
2) मजुरांची कामावर वाढवलेली संख्या व काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस – व्यस्तप्रमाण (कारण जेवढे मजूर जास्त तेवढे काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस कमी.)
सोडवून पाहू
खालील सारणीत अभ्यास आणि त्यावरून प्रमाणाचा प्रकार ओळखून लिही.
1 एक कार 20 लीटर पेट्रोलमध्ये 400 किमी अंतर कापते तर तीच कार 40 लीटर पेट्रोलमध्ये किती किमी अंतर कापेल ?
2 एका घराचे बांधकाम 40 मजूर 60 दिवसांत पूर्ण करतात. मजूरांची संख्या काही कारणांमुळे कमी करून 24 केली, तर बांधकाम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील ?