isro : गुड! ‘गगनयान’ मॉडेलची विंड टनल चाचणी सुरू – isro testing gaganyaan in the largest wind tunnel of country

[ad_1]

नवी दिल्लीः भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) ने आपले पहिले मानव मिशन गगनयान (Gaganyan) यशस्वी बनवण्यासाठी बेंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये ओपन सर्किट विंड टनलमध्ये चाचणी घ्यायला सुरूवात केली आहे. जर गगनयानचे मॉडेल या चाचणीत यशस्वी झाले तर त्या आधारावर एक प्रोटोटाइप बनवले जाईल. अन्यथा अयशस्वी झाल्यास त्यात अनेक बदल करण्यात येऊ शकतात.


विंड टनलचा इतिहास


या विंड टनलचे निर्माण १९५० साली झाले होते. त्यानंतर १९५९ साली म्हैसूरचे राजा जय चामराजेंद्र वाडियार यांनी या टनलचे उद्धाटन केले होते. या टनलमध्ये कुलिंग टॉवर आहेत. तसेच टनलमध्ये विमान, जहाज आणि अंतरिक्ष लाँचिंग गाडीची चाचणी केली जाते. चाचणी पूर्ण झाल्यानंतर मॉडेलच्या कमतरता शोधून त्या दुरुस्त करता येतात. याआधी इस्रोने चाचणीसाठी लाकडाने बनवलेल्या मॉड़ेलचा वापर केला जात असत.

अवघ्या १.४ लाखात टनल तयार


या विंडो टनलला बनवण्यासाठी केवळ १.४ लाख रुपये खर्च आला होता. हे विंड टनल २० फुट रूंद आणि ८० फुट लांबीचे आहे. याचे आणखी एक १६ मीटरचे दोन पंखे आहेत. जे १६० प्रतितास वेगाने हवा फेकते. या टनलमध्ये हवेच्या दबावामुळे मॉडेलची चाचणी केली जाते. तसेच मॉडेल मजबुत आहे की नाही, हे तपासले जाते.


चार वायुसेनेचे पायलट सज्ज


देशाचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट गगनयानसाठी वायुसेनेच्या चार पायलटना रशियात प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. हे प्रशिक्षण एका वर्षाचे असणार आहे. गागरिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये हे मिशन तयार केले जात आहे. या सेंटरमध्ये भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा आणि त्यांचे सहकारी रवीश मल्होत्रा यांना प्रशिक्षण दिले जाईल. चार पायलटमध्ये जैव चिकित्सा, शारिरीक अभ्यास, सोयूज मानव अंतरिक्ष यानची मॉडेलच्या माहितीचा अभ्यास करतील.

बापरे! पाकिस्तानला गुगल आणि फेसबुकही वैतागले

चीनः घरात कैद लोकांनी ‘असं’ स्वतःला व्यस्त ठेवलं

युनिकोड म्हणजे काय?, माहित आहे का?

म्हणून आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतात



[ad_2]

Source link

2 thoughts on “isro : गुड! ‘गगनयान’ मॉडेलची विंड टनल चाचणी सुरू – isro testing gaganyaan in the largest wind tunnel of country”

Leave a comment