[ad_1]
ESPNcricinfo ने विराट कोहलीचा एक फोटो ट्विट केला आहे. ज्यात विराट फोनवर बोलताना दिसत आहे. एका यूट्यूबवरील व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, कोहली ज्या फोनवरून बोलत आहे. तो फोन iQOO Pro 5G आहे. iQOO इंडियाच्या ट्विटर पेजवर कमिंग सून अशी टॅगलाइन सह ब्रँडचा लोगो पोस्ट करण्यात आला आहे. अन्य एका टीझरमध्ये कंपनीने सांगितले की, भारतीय बाजारात येणारा त्यांचा स्मार्टफोन 5G आणि लिक्विड कूलिंग फीचरसह असणार आहे.
Don’t be fool #StayCool iQOO India Coming Soon #iQOOIndia #StayCool #MonsterInside https://t.co/pNLfbolTpC
— iQOO India (@iQOO_In) 1580727009000
यूट्यूब चॅनेल RevAtlas ने आपल्या एका व्हिडिओत म्हटले की, विराट कोहली iQOO स्मार्टफोन आधीपासून वापरत आहे. ४ मिनिट १२ सेकंदाचा हा व्हिडिओ ESPNcricinfo कडून ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओत स्पष्टपणे म्हटले की, कोहलीचा हातातील फोन iQOO Pro 5G Edition स्मार्टफोन असू शकतो. या फोनला गेल्यावर्षी चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. कोहलीच्या हातातील फोनची डिझाईन ही गेल्यावर्षी लाँच झालेल्या फोनशी मिळती जुळती आहे.
या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस SoC प्रोसेसर दिला आहे. हा फोन फेब्रुवारी महिन्यात लाँच होणार असल्याची माहिती iQOO इंडियाचे संचालक (मार्केटिंग) गगन अरोडा यांनी दिली होती. या फोनला ५ जी नेटवर्कचे कनेक्शन सपोर्ट असणार आहे. हा फोन 44W सुपर फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येणार आहे. iQOO हा विवोचा सब ब्रँड आहे. विवोने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये चीनमध्ये लाँच केला होता. भारतीय बाजारात हा ब्रँड आता स्वतंत्र रुपात येत आहे.
If you were on the phone with Virat Kohli, what would you tell him? https://t.co/IKJfe82rpX
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) 1580697000000
इंटरनेटवर वेळ घालवण्यात भारत जपानच्या पुढे
फेसबुकसह ‘या’ टॉप सोशल नेटवर्किंग साइट्स
[ad_2]
Source link