[ad_1]
जगभरात ४.५ अब्ज लोक इंटरनेटचा वापर करीत आहेत. तर सोशल मीडिया युजर्सची संक्या ३.८ अब्ज इतकी आहे. जगातील ६० टक्के लोक ऑनलाइन झाले आहेत. गेल्यावर्षी इंटरनेट युजर्सची संख्या २९.८ कोटी होती. तर मोबाइल युजर्सची संख्या ५.१९ अब्ज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी १२.४ कोटी अधिक आहे. वर्षभराची आकडेवारी काढली तर १०० दिवस इंटरनेटवर घालवली जाते. जगारत प्रतिदिन इंटरनेटवर सरासरी ६ तास ४३ मिनिट वेळ घालवला जातो. जर आपण प्रतिदिन ८ तास झोपेसाठी देत असू तर त्यातील ४० टक्के वेळ इंटरनेटवर घालवला जात आहे.
सर्वात जास्त इंटरनेटचा वापर करणाऱ्या देशाची यादी काढली तर त्यात फिलिपिन्स सर्वात पुढे आहे. फिलिपिन्सचे लोक २४ तासांपैकी ९ तास ४५ मिनिट स्मार्टफोनवर घालवत आहेत. तर दुसऱ्या नंबरवर दक्षिण आफ्रिका आहे. येथील लोक ९ तास २२ मिनिट वेळ घालवतात. ब्राझीलचे लोक दरदिवशी ९ तास १७ मिनिट वेळ घालवतात. ब्राझील तिसऱ्या नंबरवर आहे. भारतातील लोक दररोज ६ तास ४३ मिनिट इंटरनेटवर घालवतात. तर चीनचे लोक ५.५० तास इंटरनेटवर घालवतात. जपानचे लोक सर्वात कमी वेळ इंटरनेटवर घालवतात. ते फक्त ४ तास २२ मिनिट इंटरनेटवर घालवत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
फेसबुकसह ‘या’ टॉप सोशल नेटवर्किंग साइट्स
फ्लिपकार्टवर २४ इंच LED टीव्ही ५ हजारांत
[ad_2]
Source link