कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग (Samsung) ने गॅलेक्सी ए सीरिजचा ए०१ (Samsung Galaxy A01) स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये लाँच केला आहे. युजर्सला या फोनमध्ये लेटेस्ट प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्याचा सपोर्ट मिळणार आहे. या आधी कंपनीने ए५१ ला भारतासह अन्य देशात लाँच केले होते. सॅमसंगने गॅलेक्सी ए०१ भारतात कधी लाँच करणार याबाबत अद्याप माहिती उघड केली नाही.
या फोनची किंमत ८ हजार ५५० रुपये असण्याची शक्यता आहे. ६ फेब्रुवारी पासून हा फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. ब्लॅक, ब्लू आणि रेड या तीन कलरमध्ये खरेदी करता येऊ शकणार आहे. हा फोन शाओमी, ओप्पो आणि विवोच्या फोनला टक्कर देईल. या फोनमध्ये ५.७ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ एसओसी सह २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. Samsung Galaxy A01 या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप (दोन कॅमेरे) देण्यात आले आहेत. यात १३ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. युजर्संना फोनमध्ये फ्रंटमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.
फोनमध्ये ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.