iphone se 2 : अॅपलचा सर्वात स्वस्त ‘आयफोन’ उद्या लाँच होणार – iphone se 2 could be launch tomorrow report says it is the cheapest phone ever of apple that is 15th april

[ad_1]

नवी दिल्लीः अॅपल कंपनीचा सर्वात स्वस्त समजला जाणारा आयफोन iPhone SE 2 उद्या १५ एप्रिल रोजी लाँच करण्यात येणार आहे. अनेक दिवसापासून या आयफोनची चर्चा सुरू आहे. हा आयफोन याआधी ३१ मार्चला लाँच करण्यात येणार होता. परंतु, भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने या फोनची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर हा फोन ३ एप्रिलला लाँच करण्यात येणार असल्याची माहीती सुद्धा समोर आली होती. परंतु, आता हा आयफोन १५ एप्रिलला लाँच होणार आहे. तर २२ एप्रिलपासून या फोनची विक्री करण्यात येणार आहे.

वाचाः करोनाः कर्नाटकच्या ‘या’ टेक्नोलॉजीचे कौतुक


या आयफोनच्या लाँच आधी बऱ्याच रिपोर्ट्स लिक झाल्या आहेत. त्यात आयफोनची डिझाईन आणि फीचर्सची माहिती आहे. लाँच होणारा आयफोन हा २०१६ साली आलेल्या iPhone SE चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या आयफोनच्या डिझाईन संदर्भात आलेल्या माहिती नुसार, या फोनमध्ये iPhone 8 चे फीचर्स पाहायला मिळतील. कंपनीने आयफोन SE 2 मध्ये टच आयडी फीचर दिले होते. तसेच अनेक युजर्संना या फोनमध्ये फेस आयडी देण्याची शक्यता आहे.

वाचाः LG Folder 2 फ्लिप फोन लाँच, पाहा किंमत


या आयफोनमध्ये iPhone 11 सीरिजमधील A13 बायॉनिक चिपसेट दिली जाण्याची शक्यता आहे. नवीन आयफोनमध्ये ४.३ इंचाचा डिस्प्ले असू शकतो. तसेच कंपनी ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि १२८ जीबी स्टोरेज या पर्यायामध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत ३० हजार ४०० रुपये असू शकते. उद्या लाँचिंगवेळी या फोनमध्ये आणखी कोणते फीचर्स तसेच या फोनची किंमत किती असेल हे अधिकृतपणे स्पष्ट होईल.

वाचाः ओप्पो Ace 2 स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स



[ad_2]

Source link

Leave a comment