♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

international conferencing call: ‘कॉन्फरन्स कॉल’ पडणार महागात; ‘ट्राय’चा इशारा – international conferencing call rates may hike from next month

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तुम्ही तुमच्या परदेशी असलेल्या मुलांशी बोलण्यासाठी किंवा इतर काही कामांसाठी आंतरराष्ट्रीय (आयएसडी) ‘कॉन्फरन्स कॉल’ करत असाल, तर सावधान! कारण महिन्याअखेर तुमच्या बिलाची रक्कम तुमची डोकेदुखी ठरू शकते. जवळजवळ सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स कॉल’चे दर वाढवले असून, नागरिकांनी ही सेवा अधिक वापरल्यास त्यांना त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागू शकते. केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) याबाबत ग्राहकांना एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

वाचाः पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेले ‘Y2K’ आहे तरी काय?

या पत्रकामध्ये आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स कॉल एका मर्यादेतच वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या जगभरात लॉकडाउन सुरू असल्याने भारतातील अनेक तरुण, विद्यार्थी, नोकरदार वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. भारतात वास्तव्यास असलेले त्यांचे पालक अनेकदा त्यांच्याशी कॉल्सद्वारे संवाद साधतात बऱ्याचदा नेटवर्क नसल्याने इंटरनेटऐवजी साध्या फोन कॉल्सचा वापर केला जातो. त्यातही एका पेक्षा अनेकांना बोलायचे झाल्यास ‘कॉन्फरन्स कॉल’ केला जातो. लॉकडाउनच्या काळात या कॉल्सची संख्या वाढल्याने टेलिकॉम कंपन्यांकडून त्यांचे दर वाढवण्यात आले आहेत.

याबाबत ‘ट्राय’कडे ग्राहकांनी अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींमध्ये ग्राहकांनी टेलिकॉम कंपन्यांनी अचानक बिलाची रक्कम वाढवल्याचा आरोप केला आहे. तक्रारींचा तपास केला असता संबंधित सर्व ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स कॉल केले असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे त्यांच्या बिलाच्या रकमेत मोठी वाढ झाली. ही समस्या इतरांनाही भेडसावू नये, यासाठी ट्रायकडून ग्राहकांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कॉल्सचा वापर पुढील काही दिवस जपून करावा, कॉल्सचा कालावधी कमी असावा, अशा काही प्रमुख सूचनांचा यामध्ये समावेश आहे.


‘ट्राय’ने ग्राहकांना केलेल्या सूचना

– आंतरराष्ट्रीय कॉल करताना शक्यतो कॉन्फरन्स कॉल करणे टाळावे.

– कॉल्सचा कालावधी कमी असावा आणि त्याची नोंद करून ठेवावी.

– कॉन्फरन्स कॉल्ससाठी उपलब्ध असलेल्या सुरक्षित प्लॅटफॉर्मचाच केवळ वापर करावा.

नोकरदारांच्या खिशाला चाट

मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स कॉल करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात बसलेली व्यक्ती एकाच वेळी कामासाठी म्हणून युरोप आणि अमेरिकेतील सहकाऱ्यांशी संवाद साधत. पुणे आणि महाराष्ट्रातून दररोज असे हजारो कॉल्स होतात. या कर्मचाऱ्यांना मात्र वाढलेल्या दराचा फटका बसणार आहे. त्यांनीही हे कॉल्स करताना काळजी घ्यावी, असे आवाहन ट्रायकडून करण्यात आले आहे.

वाचाः लॉकडाऊनः जिओचा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लान लाँच

वाचाः लॉकडाऊनमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च काय केले?

वाचाः ‘रेडमी नोट ९ प्रो’च्या जाहीरातीत अणूबॉम्ब; शाओमीची माफी

[ad_2]

Source link