[ad_1]
देशात मार्च महिन्यापासून करोना व्हायरसला रोखण्यासाठी मोहीम सुरू आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने आरोग्य सेतू मोबाइल अॅप लाँच केला होता. स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड झाल्यानंतर हे अॅप ब्लूटूथ आणि जीपीएस बेस्ड् अॅप्लिकेशन आहे. या अॅपमुळे कोविड-१९ रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर अलर्ट करण्याचे काम हे अॅप करते. आरोग्य सेतू अॅपला आतापर्यंत १० कोटींहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. लाँचवेळी हे अॅप गुगल प्ले आणि अॅपल अॅप स्टोरवर उपलब्ध होते. आरोग्य सेतू मोबाइल अॅप तयार करणाऱ्या नीती आयोगाने आणि पंतप्रधान यांच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार यांनी आरोग्य सेतू मित्र (AarogyaSetu Mitr) नावाची वेबसाइट लाँच केली आहे.
वाचाःOppo A31 स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स
आरोग्य सेतूचा असा वापर करा
>> आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यासाठी फोन नंबरची नोंदणी करा. फोन नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी येईल. ते एन्टर केल्यानंतर अॅपची नोंदणी होईल.
>> त्यानंतर हे अॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचे अॅक्सिस मागेल.
>> अॅप उघडल्यानंतर पर्सनल माहिती विचारली जाईल. ज्यात लिंग, नाव, वय, व्यवसाय आणि ३० दिवसांचा प्रवासाची माहिती विचारली जाईल. तुम्ही हे पर्याय स्कीप करू शकतात.
>> त्यानंतर भाषा निवडू शकतात. संकटाच्या या काळात स्वतः कार्यकर्ता म्हणून नोंदणी करू शकतात.
>> आरोग्य सेतू अॅप हे एक सोशल ग्राफचा वापर करतो. ज्यात हाय रिस्कची एक गट माहिती पडतो. सोशल ग्राफ लोकेशनची माहिती या आधारावर बनवली जावू शकते. ज्यावेळी तुम्ही हाय रिस्कच्या गटात आले तर तुम्हाला अलर्ट मिळेल. हाय रिस्क गटात आल्यानंतर अॅप टेस्ट सेंटरला जाण्यासाठी सूचना करेल.
वाचाः Redmi Note 9 Pro चा दुसरा सेल आज, १ हजारांचा डिस्काउंट
वाचाःदेशातील गावा-गावात बीएसएनएलचा Wi-Fi Hotspot मिळणार
[ad_2]
Source link