india lockdown : मोदींचं ‘लॉकडाऊन’ चं भाषण, ‘इतक्या’ लोकांनी पाहिलं – almost 197 million people watch pm modi speech on india lockdown

[ad_1]

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा करणारं भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिलं गेलं. या भाषणाची माहिती नुकतीच टीव्ही रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्टिंग ऑडियन्स रिसर्च काउंसिल्स (बार्क) ने दिली आहे. प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी ट्विट करून याची माहिती दिली. आयपीएलचा फायनल सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांपेक्षाही जास्त लोकांनी मोदींचं हे भाषण पाहिलं आहे. मोदींचं भाषण १९.७ कोटी लोकांनी पाहिलं तर आयपीएलचा फायनल सामना १३.३ कोटी लोकांनी पाहिला होता.

बार्कच्या रेटिंगनुसार, १९ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण १९१ टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आले होते. गेल्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० रद्द करण्यात आल्याचे भाषण केले होते. ते १६३ चॅनेलवर दाखवण्यात आले होते. तसेच ६.५ कोटी लोकांनी हे भाषण ऐकले होते. तर नोटबंदीचे भाषण ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ११४ चॅनेलवर दाखवण्यात आले होते. हे भाषण ५.७ कोटी लोकांनी पाहिलं होतं. म्हणजेच लॉकडाऊन संबंधीचं भाषण आता पर्यंत सर्वात जास्त पाहिलं गेलेलं मोदींचं भाषण ठरलं आहे.

करोना व्हायरस मुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सरकारने करोनाला रोखण्यसाठी हेल्पलाइन नंबर, व्हॉट्सअॅप नंबर, मेल आणि अॅप लाँच केले आहेत. लोकांना यावरून करोना संबंधीची माहिती देण्यात येत आहे.

BSNLचा युजर्संना झटका, या प्लानच्या वैधतेत घट

फोनमधील मेसेज डिलिट झालाय?, पुन्हा मिळवा

करोनाचा फटका, MI 10 लाँचिंग पुढे ढकलली

‘विवो इंडिया’कडून राज्य सरकारला १ लाख मास्क



[ad_2]

Source link

Leave a comment