[ad_1]
सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर खूप साऱ्या युजर्संनी हा दावा केला आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. या दाव्यासह युजर्संनी एका टीव्ही न्यूज चॅनेलची ब्रेकिंग प्लेट शेअर केली आहे.
या ब्रेकिंग प्लेटवर लिहिलेय, गृहमंत्री अमित शहा करोना हे सुद्धा संसर्गाच्या संपर्कात आहे आहेत. गेल्या आठवड्यात इटलीहून ते परतले होते. परत आल्यानंतर त्यांनी करोनाची चाचणी केली नाही, त्यामुळे संसर्ग जास्त बळावला.

खरं काय आहे?
अमित शहा यांना Covid-19 चा संसर्ग झाला नाही. शहा यांनी २५ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीचा एक फोटो ट्विट केला होती. या फोटोत ते पंतप्रधानांच्या बाजुच्या खुर्चीत बसले होते. हा फोटो सोशल मीडियावर खूप शेअर करण्यात आला होता. कारण, बाकीचे सदस्य करोना व्हायरसमुळे सोशल डिस्टेंसिंगचे पालन करीत अंतर ठेवून बसलेले होते.
शहा यांनी या फोटोसोबत लिहिले होते, सोशल डिस्टेंसिंगची वेळ आहे. आम्ही याचे पालन करीत आहोत. तुम्ही करताय ना?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीचा फोटो. शहा यांनी यावेळी या ट्विटमध्ये #IndiaFightsCorona हॅशटॅग सुद्धा वापरला होता.
Social distancing is need of the hour. We are ensuring it… Are you? Picture from today’s cabinet meeting chaired… https://t.co/uF2gbyqvyl
— Amit Shah (@AmitShah) 1585118936000
तसेच अमित शहा हे गेल्या काही महिन्यांपासून इटलीला गेले नव्हते.
ज्या ग्राफिक कार्डला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचा दावा करण्यात येत आहे. खरं म्हणजे ही ब्रेकिंग ‘Break Your Own News’ नावाच्या वेबसाइटवरून ही ब्रेकिंग बनवण्यात आली आहे. या वेबसाइटवर कोणीही आपली मनपसंत ब्रेकिंग न्यूज ‘Breaking News’लिहू शकतो. वेबसाइटवर युजर्संसाठी वेगवेगळे टेंपलेट उपलब्ध आहेत.
या ग्राफीक कार्डमध्ये फेक न्यूज पसरवणाऱ्यांनी आज तक चॅनेलचा स्क्रीनग्रॅबचा वापर केला आहे. आणि यात अमित शहा यांचा फोटो अपलोड केला आहे.
निष्कर्ष
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करोना व्हायरस संसर्गाची लागण झाल्याचा टेलिव्हीजन चॅनेलचा जो स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, तो खोट आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
[ad_2]
Source link