[ad_1]
देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी ‘हुंदाई मोटर इंडिया’ (Hyundai Motor India) त्यांच्या प्रसिद्ध ‘एसयूव्ही क्रेटा’ला नव्या रुपात लॉन्च करणार आहे. कपंनीने याबाबत The All New CRETAचा पहिला टीजर लॉन्च केला आहे. ‘हुंदाई क्रेटा’ २०१५ मध्ये भारतात लॉन्च झाली होती. कंपनीने नवी ‘क्रेटा’ ग्राहकांना नवा, चांगला अनुभव देणार असून इंडस्ट्रीमध्ये एक बेंचमार्क सेट करणार असल्याचं सांगितलं आहे.
नवीन क्रेटाचा टीजर यूट्यूब आणि ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. कंपनीकडून ऑटो एक्सपो २०२० मध्ये नवीन क्रेटा लॉन्च होणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, क्रेटाची किंमत जवळपास ९९९,९९० रुपये असण्याची शक्यता आहे.
Catch a sneak peak of the #AllNewCRETA, ready to blow your mind. Stay tuned for the unveiling on 6th February at the #AutoExpo2020. pic.twitter.com/FFVINKerdz
— Hyundai India (@HyundaiIndia) February 1, 2020
सध्या असणाऱ्या क्रेटामध्ये तीन इंजिनचा ऑप्शन आहे. यात १.६L Dual VTVT Petrol Engine, १.४L CRDi Diesel Engine आणि १.६L CRDi VGT Diesel Engine असे ऑप्शन आहेत.
Witness the Powerful Design of the #AllNewCRETA. Stay tuned for more exciting updates! pic.twitter.com/6FMricyvBT
— Hyundai India (@HyundaiIndia) February 1, 2020
हुंदाई भारतात सध्या १३ मॉडेल कार बनवते. यात SANTRO, GRAND i10, GRAND i10 NIOS, ELITE i20, ACTIVE i20, XCENT, VENUE, VERNA, CRETA, ELANTRA, TUCSON आणि KONA Electric एसयूव्हीचा समावेश आहे.
[ad_2]