[ad_1]
हॅकर्सने Google सर्च इंजिनचं गुगल मॅप हॅक केलं आणि रिकामी रस्त्यावर वाहतूक कोंडी दाखवली. ९९ सेकंडहँड स्मार्टफोन्सच्या मदतीने बर्लिनच्या एका आर्टिस्टने ही कमाल केली. सिमॉन वेकर्ट असं त्याचं नाव आहे.
गंमत म्हणून सिमॉनने हे प्रँक केलं. पण यानंतर गुगल मॅपच्या अत्यंत रिकाम्या रूटवरदेखील प्रचंड वाहतूक कोंडी दाखवण्यात आली. यूजर्सना ट्रॅफिकची योग्य माहिती देण्यासाठी गुगल स्लो मूव्हिंग किंवा हेवी ट्रॅफिकचा डेटा घेतो. यासाठी गुगल एखाद्या खासगी भागातून प्रवास करणाऱ्या अशा यूजर्सचे मोबाइल अॅक्सेस करते, जे लोक गुगल मॅपचा वापर करत असतात. सिमॉनने ट्रॅफिक जामची माहिती देणाऱ्या गुगलच्या याच प्रक्रियेसोबत छेडछाड केली.
कसं केलं गुगल मॅप हॅक
सिमॉनने एका लहान हँड ट्रॉलीत ९९ स्मार्टफोन ठेवले. या सर्व स्मार्टफोनचे गुगल मॅप ऑन होते. ही ट्रॉली सिमॉन एका रिकाम्या रस्त्यावर घेऊन गेला. गुगलला सिमॉनचं हे प्रँक कळलं नाही आणि गुगल मॅपवर हा रिकामा रस्तादेखील वाहतूक कोंडीचा दिसू लागला. या प्रँकमुळे कोणाचं नुकसान झालेलं नसलं तरी मॅप यूज करणाऱ्या चालकांना मात्र गुगलने रि-रुट केलं होतं!
आता फेसबुकमधूनही हिस्ट्री डिलिट करता येणार
भारतात गुगल मॅपमध्ये वाहतूक व्यवस्थेसाठी लाल, निळा आणि पिवळ्या रंगाचा वापर होतो. लाल म्हणजे खूप वाहतूक कोंडी, पिवळा म्हणजे थोडी मुव्हमेंट आणि ब्ल्यू म्हणजे रिकामा रस्ता. सिमॉनच्या या प्रँकने गुगलला अलर्टही केलं आहे.
[ad_2]
Source link