[ad_1]
या फोनच्या खास वैशिष्ट्यांवर नजर टाकल्यास या फोनमध्ये अँड्रॉयड १० आधारावर यूआय २.० मिळणार आहे. तसेच फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळणार आहे. याचा रिझॉल्यूशन १०८०X२४०० पिक्सल आहे. फोनमध्ये सुपर अमोलेड प्लस डिस्प्ले आहे. Samsung Galaxy S10 Lite मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळणार आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप देण्यात आला आहे. यात पहिला ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. दुसरा १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगलचा आणि तिसरा ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासह सुपर स्टडी ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेश मिळणार आहे. यामुळे फोटो आणि व्हिडिओ दोन्हीही सोबत काम करू शकतील.
या फोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनला सुपर फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. बॅटरी दोन दिवसापर्यंत बॅकअप देते, असा कंपनीचा दावा आहे. फोनचे वजन १८६ ग्रॅम आहे. फोनमध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. भारतात ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत ३८ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४० हजार ९९९ रुपये इतकी आहे. हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत ५ हजार रुपयांची ऑफर्स मिळणार आहे. तसेच ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय यासारखा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फोन ऑरा ग्लो, ऑरा ब्लॅक आणि ऑरा रेड या तीन रंगात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Airtel युजर्संना झटका; ‘ही’ खास सेवा बंद
वोडाफोन, एअरटेलचा ७४९ रु. चा प्लान..कोणता चांगला?
एचडी डिस्प्लेचा Lava Z53 भारतात लाँच, पाहा किंमत
[ad_2]
Source link