वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी कशा प्रकारे करायची ?  

वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी कशा प्रकारे करायची ? 

  बारा वर्ष सेवेला पूर्ण झाल्यानंतर आपण वरिष्ठ वेतन श्रेणी मध्ये व चोवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण निवड वेतन श्रेणी मध्ये येत असतो त्याकरिता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद यांच्यातर्फे प्रशिक्षण आयोजित केले जाते सदर प्रशिक्षणाकरिता ऑनलाइन नोंदणी करायचे आहे या पोस्टमध्ये आपणास ही नोंदणी कशा प्रकारे करायची याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे . 

नोंदणी करण्यासाठी खालील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद पुणे यांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाकरिता तयार करण्यात आलेल्या  पोर्टलच्या खालील  लिंक वर क्लिक करा

https://training.scertmaha.ac.in/index.aspx

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाकरिता कोणती पात्रता व निकष आहे याकरिता

 येथे क्लिक करा 

आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येईल त्यामध्ये वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी यावर क्लिक करा 

यानंतर आपल्या समोर आपल्याला कोणती  वरिष्ठ किंवा निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी करायचे आहे  आपल्याला लागू असेल त्या योग्य त्या टॅब वर क्लिक करा 

यानंतर आपल्या समोर खालील प्रकारे स्क्रीन येईल

यामध्ये शालार्थ आयडी आपली जन्मतारीख व मोबाईल नंबर अचूक माहिती भरावी व रजिस्टर या वर क्लिक करावे 

वरील रजिस्टर बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रकारे  आपली  माहिती आपोआप येईल.

सदर माहितीमध्ये आपले मराठी मध्ये नाव इमेल आयडी  रिक्त माहिती व  आपली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता निवडल्यानंतर 

आपला योग्य तो प्रशिक्षण गट निवडा 

यानंतर जतन कराया वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट ऑप्शन येईल सदर प्रशिक्षणाकरिता दोन हजार रुपये इतकी प्रशिक्षण शुल्क आहे आपण ते  गुगल पे करिता Bill desk  हा ऑप्शन तर फोन पे करिता Rpzer pay  हा ऑप्शन  आपल्याला योग्य तो ऑप्शन निवडा व  आपण गुगल पे फोन पे तसेच क्रेडिट कार्ड नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकता .

 आपले पेमेंट पूर्ण झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवर पेमेंटची पावती व आपल्याला आपल्या रजिस्टर ई-मेल आयडी वर  रजिस्ट्रेशनची माहिती उपलब्ध होते 

 अशाप्रकारे आपण वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण एक करिता नोंदणी करू शकता .

सदर नोंदणी करताना काही अडचण निर्माण झाल्यास आपण सदर पोर्टलच्या हेल्प लाईन वर मेल करू शकता तो हेल्पलाइनचा मेल खालील प्रमाणे आहे

Email:trainingsupport@maa.ac.in

वरील पोस्टच्या माध्यमातून आपणास वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी करिता प्रशिक्षण नोंदणी कशा प्रकारे करायची याची निश्चितच माहिती झाली असेल.  सदर www.sandeepwaghmore.in  संकेतस्थळावर शिक्षकांना , विद्यार्थ्यांना उपयुक्त  अशी माहिती शेअर केली जाते .  तेव्हा नियमित या संकेतस्थळाला भेट देत राहा .