whatsapp block status, how to check whatsapp block
व्हॉट्सअॅपचा जगभरात कोट्यवधी लोक वापर करतात. तसेच whatsapp सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपमध्ये लागोपाठ नवीन फीचर्स येत आहेत. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅप युजर्सला चांगली सेवा देता यावी यासाठी नवीन नवीन अपडेट जारी करण्यात येते. whatsapp block हे देखील त्यापैकी एक आहे.
सेफ्टी, खासगी यासारखे असंख पर्याय या अॅप्समध्ये आहेत. व्हॉट्सअॅपमधील एक फीचर ब्लॉकिंग आहे. जर तुम्हाला कोणी मेसेज करून त्रास देत असेल तर तुम्ही त्याला ब्लॉक करू शकता.
ब्लॉक केल्यानंतर तो तुम्हाला मेसेज पाठवू शकत नाही. किंवा तो तुमचे व्हॉट्सअॅप स्टेट्स किंवा प्रोफाईल पिक्चर पाहू शकत नाही. जर तुम्हाला माहिती करायचे की आपल्याला कुणी-कुणी व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले आहे. how to check if someone blocked you on whatsapp हे जाणून घेण्याची अधिकृत सोय नाही. परंतु, काही टिप्स आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही हे जाणून घेऊ शकता.
जर एखाद्या युजरने तुम्हाला ब्लॉक केले असेल तर या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ही माहिती करून घेऊ शकता….
१. लास्ट सीन किंवा ऑनलाइन चेक करा
![](https://sandeepwaghmore.in/wp-content/uploads/2020/05/whats-app-last-seen.jpg)
व्हॉट्सअॅपवरचा हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपमधील विंडोच्या वर दिलेल्या युजरचे लास्ट सीन किंवा तो ऑनलाइन आहे की नाही, हे चेक करू शकता. या वरून someone blocked you on whatsapp हे कळेल.
युजर आपली प्रायव्हसी सेटिंग बदलू पण शकतो. परंतु, हे इंडिकेटर आहे. ज्यातून तुम्हाला संकेत मिळू शकतात. व्हॉट्सअॅपवर दिवसभरात हजारो मेसेज धडाधड पडत असतात. काही अनोळखी लोक सुद्धा मेसेज पाठवत असतात. आपल्याला कुणी ब्लॉक केले हे लवकर समजत नाही.
२.. प्रोफाईल पिक्चर बदललेली दिसणार नाही
![](https://sandeepwaghmore.in/wp-content/uploads/2020/05/profile-1024x1024.jpg)
जर तुम्हाला एखाद्या युजरने whatsapp block केले तर तुम्ही त्या युजरच्या प्रोफाईलवर जाऊन त्याची प्रोफाईल पिक्चर बदलली आहे का हे तपासू शकता. जर तुम्हाला त्या युजरने Block केले असेल तर तुम्हाला त्या युजरची प्रोफाईल पिक्चर बदललेली दिसणार नाही.
तुम्हाला त्याची प्रोफाईल पिक्चर तीच दिसेल जी त्याने शेवटी तुमच्यासोबत चॅट केली होती. जर खूप दिवसांपर्यंत प्रोफाईल पिक्चर बदललेली दिसली नाही की शक्यता आहे. तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केले असल्याची. या वरून someone blocked you on whatsapp हे कळेल.
३. डबल चेक मार्क
![](https://sandeepwaghmore.in/wp-content/uploads/2020/05/whats-app-message-dubble-tick.jpg)
जर एखाद्या नंबरने तुम्हाला ब्लॉक केले असेल तर तुम्ही पाठवलेल्या मेसेजनंतर तुम्हाला केवळ एक चेक मार्क दिसेल. याचाच अर्थ असा होतो की, त्या युजरने तुम्हाला ब्लॉक केले आहे. कारण, तुमचा मेसेज त्या युजर पर्यंत पोहोचलाच नाही. ब्लॉक केल्यानंतर कितीही मेसेज पाठवले तरी ते मेसेज त्या व्यक्तीपर्यंत जात नाही.
त्यामुळे नेहमी केवळ एकच चेक मार्क दिसते. मेसेज पाठवल्यानंतर काही तासांनंतर सुद्धा तुम्हाला केवळ एक चेक मार्क दिसत असेल तर समजून जा तुम्हाला त्या युजरने ब्लॉक केले आहे. someone blocked you on whatsapp हे कळेल.
४. व्हॉट्सअॅप कॉल जाणार नाही
![](https://sandeepwaghmore.in/wp-content/uploads/2020/05/whats-app-call.jpg)
जर तुम्हाला एखाद्या कॉन्टक्ट नंबरने ब्लॉक केले असेल तर तुम्ही त्या नंबरवर व्हॉट्सअॅप कॉल करू शकणार नाहीत.
इंटरनेटवरून व्हॉट्सअॅप कॉल करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या युजर पर्यंत तुमचा कॉल जाणार नाही. व्हॉट्सअॅप जात नसेल तर समजून जा की, त्या युजरने तुम्हाला त्याच्या फोनमध्ये ब्लॉक केले आहे. someone blocked you on whatsapp हे कळेल.
रिचार्ज व्हाऊचर्स संपल्यानंतर अनेक जण आपल्या फोन यादीतील अनेक जणांना पर्याय म्हणून व्हॉट्सअॅप कॉल करत असतात.
५. ग्रुपमध्ये तो नंबर अॅड करू शकणार नाही
![](https://sandeepwaghmore.in/wp-content/uploads/2020/05/whats-app-block-group.png)
इंटरनेट सुरू असेल तर हे सर्व माहिती करू घेण्यास आपल्याला मदत होते. परंतु, इंटरनेट नसेल आणि तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही तपासण्यासाठी आणखी एक पर्याय आहे.
तुम्ही एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करा. व त्या युजरला तुम्हाला ज्याने Block केले असेल त्या व्यक्तीला तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करण्याचा प्रयत्न करा. जर ती व्यक्ती ग्रुपमध्ये अॅड होत नसेल तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे, असे समजून जा. जर तुम्ही अॅड करायला गेलात तर तुम्हाला ‘you are not authorized to add this contact’हा मेसेज दिसेल.
आपणास हे देखील आवडेल
3gb daily data plans: दर दिवशी 3GB डेटा देणारे मस्त प्लान
अशा पद्धतीने आपण एखाद्या व्यक्तीने आपल्याला व्हाट्सअप वरती ब्लॉक केला असेल तर ja5 टिप्स द्वारे आपण माहिती करून घेऊ शकतो आपल्याला आमचा हा लेख उपयुक्त वाटला असेल तर आपल्या मित्रपरिवार सोबत अवश्य शेअर करा या वेबसाईटवर असे उपयुक्त लेख नेहमीच प्रसिद्ध होत असतात तेव्हा या वेबसाइटला नियमित भेट देत राहा धन्यवाद