[ad_1]
रिलायन्स जिओ
जिओने आपल्या युजर्संसाठी दररोज ३ जीबी डेटाचे दोन प्लान आणले आहेत. जिओचा २८ दिवसांच्या वैधतेसह ३ जीबी डेटाटा एक प्लान आहे. जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देणाऱ्या या प्लानमध्ये अन्य नेटवर्कवर कॉलसाठी १००० मिनिट्स मिळतात. रोज १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानची किंमत ३४९ रुपये आहे.
जिओचा आणखी एक प्लान ९९९ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. दररोज ३ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएस दिले जातात. जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३ हजार मिनिट्स दिले जातात. या प्लानवर जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
वाचाः शाओमी ते सॅमसंगपर्यंत लॉकडाऊनमध्ये हे स्मार्टफोन स्वस्त
भारती एअरटेल
एअरटेलकडून दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे दोन प्लान आहेत. २८ दिवस वैधता असलेल्या या प्लानची किंमत ४०१ रुपये आहे. या प्लानमध्ये युजर्संना Disney+Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात.
दुसरा प्लान ५५८ रुपयांचा आहे. यात दररोज ३ जीबी डेटा मिळतो. तसेच झी ५ चे सब्सक्रिप्शन आणि मोबाइलसाठी फ्री अँटी व्हायरस मिळतो. अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० फ्री एसएमएस मिळणाऱ्या या प्लानची वैधता ५६ दिवस आहे.
वाचाःफेसबुकवरून आता एकाचवेळी करा ५० जणांना व्हिडिओ कॉलिंग
व्होडाफोन-आयडिया
या युजर्संना ३ जीबी डेटा देणारे अनेक प्लान आहेत. डबल डेटा ऑफरच्या मदतीने कंपनी ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा देते. आधी या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा मिळत होता. डबल डेटा ऑफरसह रोज ३ जीबी डेटा होतो. या प्लानची वैधता ८४ दिवस असून या प्लानमध्ये व्होडाफोन प्ले आणि झी ५ चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
डबल डेटा देणारा दुसरा प्लान ३९९ रुपयांचा आहे. यात ३ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. यात व्होडाफोन प्ले आणि झी५ चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. दोन्ही प्लानवर सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. दोन्ही प्लान काही निवडक सर्कलमध्ये दिले जात आहेत.
कंपनीकडून देशभरात आणखी दोन प्लान दिले जा आहेत. यात रोज ३ जीबी डेटा दिला जातो. ५५८ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवस, ३९८ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवस वैधता आहे. दोन्ही प्लानवर अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० फ्री एसएमएस सोबत व्होडाफोन प्ले आणि झी ५ चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
वाचाःReliance Jio: वर्क फ्रॉम होमसाठी बेस्ट प्लान्स, ७३० GB पर्यंत डेटा, अन्य फायदे
[ad_2]
Source link