♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

होळी का साजरी केली जाते होळी विषयी  एक वेगळी कथा | Holi Infromation in marathi    

   

   होळी का साजरी केली जाते होळी विषयी  एक वेगळी कथा   दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण अगदी संपूर्ण देशामध्ये उत्साहात साजरा केला जातो देशांमध्ये विविध ठिकाणी विविध पद्धतींनी हा होळीचा सण साजरा होत असला तरीसुद्धा ही होळी साजरा करण्यामागील उद्देश मात्र सर्वत्र एकच आहे.  होळी  या सणाचे महत्त्व अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया.Holi Infromation in marathi

        होळी Holi म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि मंगल विचार यांचा नाश करणारा असेल हा सण आपल्याला सत प्रवृत्तींचा मार्ग दाखवतो वृक्ष रुपी समिधा म्हणजेच लाकडे आपण अग्नीमध्ये समर्पित करतो आणि वातावरणाची शुद्धी करतो. असा उदांत भाव होळी साजरी करण्या मागे आहे.

          मित्रांनो खरे तर आपण फाल्गुन पौर्णिमेला हा होळीचा Holi festival उत्सव साजरा करतो मात्र भारतातल्या अनेक भागांमध्ये फाल्गुनी पौर्णिमेपासून ते पंचमीच्या पाच-सहा दिवसांत कुठे दोन तर कुठे पाच दिवस सुद्धा हा उत्सव साजरा होत आहे मित्रांनो याला उत्तर भारतामध्ये होरी दोला यात्रा अशी नाव आहेत .मित्रांनो याला उत्तर भारतामध्ये ओरी तोला यात्रा अशी नाव आहेत. तर गोव्यामध्ये आणि महाराष्ट्रात या होळीला ,होळी शिमगा ,हुताशनी महोत्सव ,होलिकादहन आणि दक्षिण भारतामध्ये कामदहन अशा विविध संज्ञा दिसून येतात बंगालमध्ये एक होळीला दौला  यात्रा किंवा होलिचा सण असे म्हणतात .

      याला वसंतोत्सव असेही म्हणतात कारण वसंत ऋतुचे आगमन याच सणापासून होतं मित्रांनो जर आपण इतिहासात पाहिलं तर एकेकाळी ढुंढा नावाची एक राक्षसी होऊन गेली. ती गावात येऊन लहान लहान मुलांना पीडा द्यायची त्यांच्या मध्ये रोग निर्माण करायची लोकांनी तिला गावाबाहेर काढण्याचे पुष्कळ प्रयत्न केले मात्र उपयोग झाला नाही .नगरातील मुलांना त्रास देणाऱ्या या ढुंढा नावाच्या राक्षसिणी चा प्रतिकार कसा करावा ? याविषयी नारद मुनींनी सम्राट युधिष्ठिराला काही उपाय सांगितले .ते म्हटले नगरातील सर्व लोकांना तू अभय दे त्यामुळे सर्व लोक आनंदित होतील त्यांची मुले आनंदाने घराबाहेर पडू देत आणि त्यानंतर वाळलेली लाकडे आणि  गोवऱ्या यांचा   ढीग  रचातिथे  रक्षोग्न  म्हणजेच राक्षसांना नष्ट करणाऱ्या मंत्रानी  अग्नी प्रज्वलित करा.आणि लहान मुलांप्रमाणे हर्षभरित मनोरम अशा टाळ्या वाजवत त्या अग्नीला तीन प्रदक्षिणा घालून गाणे म्हणा. आनंदी शब्दांनी आणि रक्षोग्न  ने ती लहान मुलांना त्रास देणारी ती पापी राक्षसीण लोकांची दृष्टी पडल्या विना निघून जाईल .

       फाल्गुन पौर्णिमेला सर्व दुष्ट शक्ती पळवून लावणारा आणि सर्व रोगांचे शमन करणारा होम करतात म्हणूनच या तिथीला विद्वानांनी होलिका असे म्हटले आहे . 

    दक्षिण भारतातील लोक काम देव दहना प्रित्यर्थ होळीचा उत्सव साजरा करतात .या दिवशीमदनाची प्रतिकृती करून तिचं दहन केलं जातं या मदनाला जिंकण्याची क्षमता फक्त होळीत आहे आणि म्हणूनच हा होलिकोत्सव साजरा केला जातो.

     फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाचे स्मृती म्हणून सुद्धा होली भारतामध्ये साजरी केली जाते या होळीच्या दिवशी पृथ्वीवरील प्रथम महायज्ञ पार पडला होता आणि या महायज्ञात ऊन भगवान श्रीहरी श्री विष्णूंना बाहेर येण्याची प्रार्थना ऋषींनी केली होती .

भगवान श्रीविष्णु धर्तीवर पाय ठेवताच स्वर्गातून सर्व देवी देवता मी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली स्वर्गातून पृथ्वीवर झालेली ती प्रथमच पुष्पवृष्टी होती आणि म्हणूनच आजही उत्तर हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये या फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या ठिकाणी होळीचा प्रदीपन केल्यानंतर ओंजळीत फुले घेऊन ती हवेत उडवली जातात त्या फुलांना पलाश फुल असं म्हटलं जातं .

मिeeत्रांनो होळी हा विकारांची होळी करण्याचा सण आहे .आपल्या मनामध्ये विकार आहेत ते सर्व जाळून टाकून नविन उत्साहाने आपण जीवन जगण्यासाठी सिद्ध व्हायला हवं आपल्यामध्ये जो काही लहानसहान अहंकार असेल या अहंकाराची होळी आपल्या अग्नीमध्ये करायचे आहे आणि शुद्ध सात्विक होऊन रंगपंचमी मध्ये आनंदाची उधळण करत नाचत गात एकत्र येऊन आपण जीवनाचा आनंद लुटावा हिंदू धर्मशास्त्र आपणास शिकवत आहे.

तर मित्रांनो तुम्हाला  होळी का साजरी केली जाते  याविषयी आज नवीन माहिती निश्चितच मिळाले असेल तर  या माहितीची लिंक आपल्या इतर ग्रुप वर देखील आवश्यक  शेअर करा . 

आपणास हे देखील आवडेल 

होळी कशी साजरी करावी ? 

 येथे क्लिक करा 

सोप्या पद्धतीने होळीचे चित्र 

येथे क्लिक करा 

होळीच्या शुभेच्छा  देणारे संदेश 

 येथे क्लिक करा