होळी कशी साजरी करावी ? | How to celebrate holi 2022

होळी कशी साजरी करावी ? How to celebrate holi 2022 मित्रांनो दरवर्षी  आपण होळी हा सण साजरा करतो परंतु नेमकी ही होळी कशी करावी होळी साजरी करण्याची पद्धत कोणती आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत . 

    मित्रांनो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने या होळीच्या सणामध्ये सहभागी व्हावं आता त्याची रचना अगदी थोडक्यात सांगतो .आपण आपल्या घरासमोर तेव्हाच तुम्ही सार्वजनिक होळी करणार असाल तर एखाद्या देवळासमोर विशेष करून आपली ग्रामदेवता आहे आपल्या गावाची दैवत आहे त्या ग्रामदेवतेसमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी.

    ज्या ठिकाणी होळी पेटवणार आहात ,होलिकापूजन करणार आहात ते स्थान शेणाने सारवून रांगोळी घालावी .एरंड माड पोफळी अथवा ऊस उभा करावा आणि त्याच्या भोवती गोवर्‍या सुकी लाकडे असावी.

 सर्वप्रथम जो  कर्ता आहे तो ही  होळी पेटवणार आहेत त्यांनी  शुचिर्भूत  व्हावे .देश कालाचा उच्चार करून संकल्प करावा . पूजा करून नैवेद्य दाखवावा कोणी होलीकाय नमहा अस म्हणून होळी पेटवावी.

    होळी Holi पेटवल्यानंतर होळीला प्रदक्षिणा घालावी पालथ्या हाताने बॉम्ब मारावी होळी पूर्ण झाल्यानंतर दूध आणि तूप शिंपडून ती शांत करावी. 

श्री होलिका देवतेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा नारळ अर्पण करावा आणि जमलेल्या लोकांना त्याचा प्रसाद द्यावा नारळ यासारखी फळे वाटावीत.

         मित्रांनो होळीची पूजा करताना जेव्हा आपण अग्नी प्रज्वलित करत आहोत तेव्हा होलीकाय नमः या मंत्राने पूजेची द्रव्य वाहून आपण होम करायचा आहे. रात्र झाल्यानंतर सर्वांनी होलिकेचे म्हणजेच वाळलेली लाकडे गोवऱ्या रचून आपण आग पेटवली आहे त्याला होलीकाअसे म्हणतात .तिचा पूजन करावं पूजा करताना काही मंत्र सुद्धा म्हटले जातात ज्याना शक्य असेल त्यानी ते मंत्र म्हणावेत मंत्राचा अर्थ थोडक्यात सांगतो. आपण हे जरी तिथे म्हंटला तरीही चालेल संस्कृत भाषेतील मंत्र म्हणण्याची गरज नाही. हे होली के आम्ही भयग्रस्त झालो आहोत घाबरलेलो आहोत म्हणून आम्ही तुझी रचना केली यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो हे होळीच्या विभूती तू आम्हाला वैभव देणारी हो .

तर मित्रांनो तुम्हाला ही होळीची माहिती  नक्कीच आवडली असेल  तर आपल्या इतर ग्रुप वर या माहितीची लिंक अवश्य शेअर करा .