[ad_1]
मुंबई : जवळपास २१ वर्षांपूर्वी म्हणजे १९९८ मध्ये गुगल Google या सर्च इंजिनची सुरुवात झाली. इंटरनेटच्या माध्यमातून या गुगलने पाहता पाहता सर्वांच्या आयुष्य़ात कायमस्वरुपी स्थान मिळवलं. कोणत्याची विषयावरील शंका, प्रश्न या साऱ्याची उत्तरं या गुगलकडे आहेत. पण तुम्हाला माहितीये का या गुगलला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? त्यातही भारतीयांकडून गुगलकडे कोणत्या प्रश्नांची सर्वाधिकी विचारणा होते याविषयी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे?
तुमच्या मनातील याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी म्हणून Googleकडून २०१९ या वर्षातील काही Trends जाहीर करण्यात आले आहेत. विविध व्यक्ती, कलाकृती, घटना आणि घडामोडी अशा कैक विषयांवर नेमकं इंटरनेटच्या माध्यमातून गुगलवर नेटकऱ्यांनी विशेषत: भारतीयांनी यंदा शोधलं तरी काय हेच Googleकडून सर्वांसमोर आणलं गेलं आहे.
विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ
Google Trendsनुसार यंदाच्या वर्षी ज्या पाच महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी गुगलवर शोधमोहिमा राबवल्या गेल्या त्यामध्ये पहिल्या स्थानावर होता क्रिकेट विश्वचषक Cricket World Cup. दुसऱ्या क्रमांकावर होती लोकसभा निवडणूक, तर तिसऱ्या क्रमांकावर होतं महत्त्वाकांक्षी चांद्रयान २. गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांमध्ये चौथ्या क्रमांकावर अभिनेता शाहिद कपूर याचा चित्रपच ‘कबीर सिंग’ होता. तर पाचव्या क्रमांकावर हॉलिवूड चित्रपट Avengers-End Gameला स्थान मिळालं.
महत्त्वाच्या पाच विषयांव्यतिरिक्त अनुच्छेद ३७०, NEET Results आणि पंतप्रधान किसान योजना अशा विषयांवरील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी, शंका दूर करण्यासाठी गुगलचा आधार घेतला.
गुगलवर नेटकऱ्यांनी घेतला ‘या’ व्यक्तिंचा शोध…
गुगलवर यंदाच्या वर्षी काही व्यक्तीविषयी जाणून घेण्याकडेही अनेकांचा कल पाहायला मिळाला. ज्यामध्ये बालाकोट एअरस्ट्राईक दरम्यानच्या काळात चर्चेत आलेल्या भारतीय वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय अनुक्रमे ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, क्रिकेटपटू युवराज सिंग, गणिततज्ज्ञ आनंद कुमार आणि अभिनेता विकी कौशल यांच्याही नावांचा समावेश असल्याचं पाहायला मिळालं.
[ad_2]
Source link