जिल्हा परिषद शिक्षकांच्या( transfer )बदल्यांसाठी पाच सिईओंचा अभ्यासगट

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या राज्यस्तरावरून होणाऱ्या ऑनलाइन जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांच्या transfer धोरणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पाच सदस्यीय अभ्यासगट बुधवारी (ता.5) स्थापन केला आहे. या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


transfer ,transfer teacher portal

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे हे या अभ्यासगटाचे सदस्य-सचिव असणार आहेत. अन्य तीन सदस्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेचे राहुल कर्डिले, नंदुरबारचे विनय गौडा आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांचा समावेश करण्यात आला आहे.


राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे transfer नवे धोरण 17 फेब्रुवारी 2017 पासून अमलात आणले आहे. या धोरणात्मक निर्णयास अनुसरून सरकारने अनेकदा शुद्धीपत्रके आणि अध्यादेश प्रसिद्ध केलेले आहेत. याशिवाय 24 एप्रिल 2017 ला शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. या ऑनलाइन बदल्यांच्या प्रक्रियेत काही त्रुटी शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे या

  • ऑनलाइन बदल्यांच्या transfer   प्रक्रियेचा अभ्यास करून,
  • त्यात सुधारणा करणे आवश्‍यक आहे. धोरणांचा अभ्यास करून
  • सरकारला बदल्यांबाबत शिफारशी सुचविण्यासाठी हा अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे.

या अभ्यासगटाने येत्या 10 फेब्रुवारीला प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि बदल्यांसंदर्भात येणारे अनुभव यांचा तौलनिक अभ्यास करावा आणि येत्या 11 फेब्रुवारीला सरकारला अहवाल सादर करण्याचा आदेश या अभ्यासगटाला देण्यात आला आहे.

माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook

Leave a comment