गोव्यातल्या बाईकच्या कुंभमेळ्यात KTM Adventure 390 लॉन्च | Indian bike week | IBW bike festival

[ad_1]

अक्षय घुगे, झी २४ तास, पणजी : गोव्यात बाईक्सचा कुंभमेळा भरलाय. जगातल्या सर्वोत्तम बाईक्स गोव्यात पाहायला मिळाल्या. ‘इंडियन बाईक वीक’ निमित्तानं गोव्यात नुकताच आयबीडब्लू बाईक फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टीव्हलमध्ये जगातल्या आघाडीच्या बाईक उत्पादक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता.

या बाईक फेस्टिव्हलमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या त्या केटीएम बाईक्स… केटीएम बाईक्सचे थरारक स्टंट तोंडात बोटं घालायला लावणारे होते.

हे अफलातून स्टंट पाहण्यासाठी गोव्यातील फेस्टीव्हलचं मैदान बाईक्सप्रेमींनी खचाखच भरलं होतं. इथं केटीएमची ऍडव्हेंचर-३९० बाईक लाँच केली. 

Image result for trymph rocket 3"
triumph rocket 3

याशिवाय हस्कवरना कंपनीने विटपिलेन-२५० आणि स्वार्टपिलेन-२५० नावाच्या दोन बाईक्स लॉन्च केल्या. ट्रायम्फची रॉकेट-३ ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. 

दुसरीकडं मेन्टिस या कंपनीची इलेक्ट्रिक बाईकही बाजारात प्रवेश घेण्यासाठी सज्ज झालीय. या बाईकला पोर्टेबल चार्जरही देण्यात आलाय. ज्यावर तुम्ही साडे तीन तास बाईक चार्ज करु शकता…

बाईक्सच्या कुंभमेळ्यात अफलातून मॉडेल्स पाहण्यासाठी उपलब्ध होती. बाईक्सच्या या कुंभमेळ्यात एखादी बाईक निवडवी आणि दुसरी आवडावी अशी स्थिती होती. बाईक्सवर लॉन्ग राईडला जाणाऱ्यांसाठी बाईक शो म्हणजे कुंभमेळा होता.



[ad_2]

Source link

Leave a comment