fake alert : fake alert: मध्य प्रदेशात सफाई कर्मचाऱ्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ भाजप-मुस्लिम खोट्या दाव्यासह व्हायरल – fake alert: attack on sanitation workers falsely passed off as bjp men beating muslim youth

[ad_1]

दावा

फेसबुक युजर Safi Mallick ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एका व्यक्तीला बेदम मारहाण केली जात आहे. व्हिडिओसोबत दावा करण्यात येत आहे की, मध्य प्रदेशात लॉकडाऊनच्या नावावर भाजपचे गुंड मुस्लिम तरुणाला मारहाण करीत आहेत. Safi Mallick च्या फेसबुकवरील बायोनुसार तो पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील काँग्रेस मीडिया को ऑर्डिनेटर आहे.

पोस्ट लिहिपर्यंत १२ हजार वेळा शेअर करण्यात आले आहे.

पोस्टचे आर्काइव्ड व्हर्जन
या ठिकाणी पाहा.

खरं काय आहे ?

व्हिडिओ मध्य प्रदेशातील आहे. परंतु, या व्हिडिओसोबत जो दावा करण्यात आला आहे तो चुकीचा आहे. खरं म्हणजे हा व्हिडिओ राज्याच्या देवास जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यावर स्थानिकांनी हल्ला केला आहे. यात एका सफाई कर्चमाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता.

कशी केली पडताळणी ?

गुगल क्रोम एक्टेंन्शन InVID च्या मदतीने आम्ही व्हिडिओला अनेक भागात फ्रेम्स केले. त्यानंतर ते रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यावेळी आम्हाला
NDTV ची एक बातमी मिळाली. या बातमीचे शीर्षक ‘Coronavirus COVID-19 Madhya Pradesh: On Camera, Madhya Pradesh Sanitation Worker Attacked, Clothes Ripped’ होते. ही बातमी १८ एप्रिल २०२० रोजी छापली होती.

रिपोर्टमध्ये जो फोटो वापरला होता. तो व्हायरल होत असलेल्या व्हिज्युअल्स सारखी दिसत आहे.

रिपोर्टनुसार, मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यात कोळसा परिसरात शुक्रवारी पालिका कर्मचारी दीपक आपल्या सहकाऱ्यासोबत सफाई करीत होता. त्यावेळी स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात एका कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढवला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या कर्मचाऱ्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. आदिल नावाच्या आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु, त्याचा भाऊ अद्याप फरार आहे. हत्येचा प्रयत्न करणे आणि अनुसूचीत जाती-जमाती अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची माहिती पोलिसांनी दिली.

निष्कर्ष

लॉकडाऊनच्या काळात मध्य प्रदेशात मुस्लिम तरुणावर भाजप गुंडाची मारहाण, असा दावा करीत जो व्हिडिओ शेअर केले जात आहे. तो दावा चुकीचा आहे. खरं म्हणजे मध्य प्रदेशातील सफाई कर्मचाऱ्यावर स्थानिकांनी हल्ला चढवल्याचा हा व्हिडिओ आहे, असे ‘मटा फॅक्ट चेक‘ च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.



[ad_2]

Source link

Leave a comment