♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 35

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस 35

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 

कृतिपत्रिका : 18

संदर्भ : इयत्ता सातवी प्रकरण 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे

अध्ययन निष्पत्ती आपल्या दैनंदिन वापरांचे स्वरूप, गुणधर्म, अवस्था व त्यांचे होणारे परिणाम यांबाबतची माहिती

स्पष्ट करता येणे.

लक्षात घेऊ याः

हे करून पहा : 1. एका चमचा किंवा वाटीमध्ये साखर घ्या व उष्णता द्या. काय होते त्याचे निरीक्षण करा. काय

शिल्लक राहिले?

साखर हे एक संयुग आहे. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या

संयोगातून साखर तयार होते.

दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय. संयुगाच्या अतिसूक्ष्म कणांना रेणू म्हणतात..

संयुगाचे गुणधर्म:

1) संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. उदाहरणार्थ- हायड्रोजन हा ज्वलनशील आहे. तो स्वत: जळतो. ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो; परंतु या दोन मूलद्रव्यांच्या संयोगाने बनणारे पाणी हे संयुग आग विझवण्यासाठी उपयोगी पडते.

2) संयुगात घटक मूलद्रव्यांचे प्रमाण निश्चित असते. उदाहरणार्थ कोणत्याही ठिकाणच्या शुद्ध पाण्याच्या नमुन्यात हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एकच अणू असतो.

3) संयुगांच्या रेणूंमध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयोगातून एकत्र आलेले असतात.

संयुगांची रेणसूत्रे : संयुगाचा निर्देश करण्यासाठी रेणुसूत्राचा वापर करतात. संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणूंची संख्या यांच्या साहाय्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजे रेणुसूत्र (Molecular formula) होय. उदाहरणार्थ : 1) मिठाच्या रेणूत सोडिअमचा एक अणू व क्लोरीनचा एक अणू असतो, म्हणून मिठाचे रेणुसूत्र NaCl असे लिहितात. 2) साखरेच्या एका रेणूत कार्बनचे 12 अणू, हायड्रोजनचे 22 अणू आणि ऑक्सिजनचे 11 अणू असतात, म्हणून साखरेचे रेणुसूत्र

हे करून पहा : 1) लिंबू सरबत तयार करा.

  1. भेळ तयार करा.

1) वरील कृती केल्याने मूळ घटकांच्या चवींमध्ये बदल झाला का ?

2) सरबत, भेळ बनविताना घटक पदार्थाचे प्रमाण नेहमी निश्चित असते का?

मिश्रण जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत मिसळतात, तेंव्हा मिश्रण तयार होते. मिश्रणात मिसळलेले पदार्थ हे मूलद्रव्ये किंवा संयुगे असू शकतात. मिश्रणातील विविध घटकांचे प्रमाण निश्चित नसते. मिश्रणे तयार होताना कोणताही रासायनिक बदल घडून येत नाही किंवा नवीन संयुगे तयार होत नाहीत. I

उदाहरणार्थ : 1) दूध हे पाणी, दुग्ध शर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि आणखी काही नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण आहे. 2) हवा हे एक मिश्रणच आहे.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment