इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 35
विषय – विज्ञान कृतिपत्रिका
कृतिपत्रिका : 19
समजून घेऊ या ध्वनी निर्मिती
संदर्भ: इयत्ता सहावी, पाठ 13 ध्वनी
अध्ययन निष्पत्ती प्रक्रिया घटना यांचा कारणांशी संबंध लावतात. लक्षात घेऊ या :
पक्ष्यांची किलबिल, गाड्यांचे हॉर्न, ट्राफिक पोलिसांच्या शिट्टीचा आवाज, प्राण्यांचे आवाज, फटाक्यांचे आवाज, ढगांचा गडगडाट असे विविध आवाज आपण आपल्या परिसरात ऐकत असतो. या विविध प्रकारच्या आवाजांना शास्त्रीय भाषेत ‘ध्वनी’ म्हणतात. काही ध्वनी मोठे असल्याने ते सहज ऐकू येतात, तर काही ध्वनी खूप लहान असल्याने ते लक्ष दिल्याशिवाय ऐकू येत नाहीत. काही ध्वनी आपल्याला आवडतात, तर काही ध्वनी आपल्याला आवडत नाहीत.
ध्वनी कसे निर्माण होत असतील?
खाली दिलेल्या कृती तुम्ही करून पाहा.
- घरातील रेडिओ अथवा टेपरेकॉर्डरवर गाणे वाजत असताना त्याच्या स्पीकरवर हात ठेवा. काय जाणवते? काही वेळानंतर रेडिओ अथवा टेपरेकॉर्डर बंद करा. आता काय होईल?
- एक रबरबँड घ्या व खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे ताणून त्याची एक बाजू सोडून द्या. काय दिसले? तुमचे निरीक्षण खालील ओळीत लिहा.

ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंची ठराविक पद्धतीने हालचाल होत असते, म्हणजेच जलद गतीने आंदोलन होत असते म्हणजेच कंपन होत असते. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन’ होणे आवश्यक असते. वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंतच आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपन थांबले की ध्वनीही बंद होतो. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो, तिला ध्वनीस्रोत म्हणतात.
सराव करू या :
1) एखादे ताट जमिनीवर पडले असता खूप मोठा आवाज होतो. तो बंद करण्यासाठी आपण काय करतो? असे केल्याने काय होते? प्रत्यक्ष प्रयोग कर व निरीक्षण खालील ओळीत लिहा.

3) खालील ध्वनी कशाच्या कंपनाने निर्माण होतात ते लिहा.
• सतार
• घंटा
• नळातून पडणारे पाणी
• खाली पडून फुटणारी वशी
4) चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पाण्याने भरलेले भांडे घ्या. त्याच्या कडेवर छोटासा
आघात करा. तुम्हाला काय दिसते?
भांड्यातील पाण्यावर लाटा/तरंग का निर्माण झाले ?