♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 34

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस 34

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 

कृतिपत्रिका : 21

समजून घेऊया: संसर्गजन्य रोग, संपर्कातून होणारे रोग संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 21 (संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध)

अध्ययन निष्पत्ती : स्वच्छता, आरोग्य / कचरा / आपत्ती आणीबाणीची परिस्थिती यांचे व्यवस्थापन आणि संसाधनांचे जतन व रक्षण ( भूमी, इंधन, जंगल इत्यादी) यांचे मार्ग सुचवतात आणि संसर्गजन्य आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेतात.

लक्षात घेऊ याः

संसर्गजन्य रोग

आईचा हात भाजून तिला झालेली जखम किंवा आजोबांची पाठदुखी दुसऱ्यांना होत नाही, परंतु फ्ल्यू, पडसे, नायटा, खरूज, कांजिण्या, गोवर अशा काही आजारांच्या बाबतीत रोग्यांपासून दूर राहण्याची काळजी घ्यावी लागते. या रोगांची एकाची दुसन्याला लागण होऊ शकते. अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात. अशा रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोगजंतू म्हणतात. प्रत्येक रोगास एक विशिष्ट रोगजंतू कारणीभूत ठरतो. शरीरात एखादया रोगाच्या जंतूंना प्रवेश मिळाला आणि ते शरीरात वाढू लागले, की रोग होती. एखादयाला पडसे झाले असेल तर त्याचे रोगजंतू त्या व्यक्तीच्या शिंका व खोकल्यातून हवेत मिसळतात. ते रोगजंतू दुसऱ्यांच्या शरीरात गेले, की त्यांच्यापैकी अनेकांना पडसे होऊ शकते. याला रोगप्रसार म्हणतात. टायफॉइडग्रस्त व्यक्तीकडून टायफॉईड (विषमज्वराचे) रोगजंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्याने टायफॉइडचा प्रसार होऊ शकतो.

रोगप्रसार

हवेमार्फत रोगप्रसार

फ्ल्यूसारख्या रोगाचे जंतू रोग्याच्या थुंकीत असतात. रोग्याने थुंकल्याने, खोकल्याने किंवा शिंकल्या हवेत पसरतात. आसपासच्या लोकांच्या शरीरात हे जंतू श्वासावाटे शिरतात. उघड्यावर थुंकू नका, खोकू नका. हवेवाटे छातीच्या व घशाच्या रोगांचा प्रसार होतो. उदाहरणार्थ, क्षय, स्वाईन फ्ल्यू, कोविड-19 इत्यादी. म्हणूनच खोकताना किंवा शिंकताना तोंडावर, नाकावर रुमाल धरायला सांगितले जाते. पाण्यामार्फत रोगप्रसार I

टायफॉइड, कॉलरा, जुलाबासारख्या आतड्यांच्या रोगांचे जंतू, तसेच काविळीचे जंतू, जंतांची अंडी रोग्याच्या विष्ठेमध्ये असतात. ही विष्ठा पाण्यात मिसळली, की हे रोगजंतूही पाण्यात शिरकाव करतात. अशा रोगजंतूंनी दूषित झालेले पाणी प्यायल्यामुळे हे रोगजंतू पाणी पिणाऱ्यांच्या आतड्यात जातात आणि रोगाची लागण होते. असा रोगप्रसार टाळण्यासाठी पाणवठ्यावर अंघोळ करणे, कपडे धुणे, नदीकाठी शौचासाठी बसणे, इत्यादी गोष्टी नेहमी टाळाव्यात.

अन्नपदार्थामार्फत रोगप्रसार

एखादया समारंभात दूषित अन्न खाल्ल्याने गॅस्ट्रो किंवा जुलाबासारख्या रोगांची लागण झाल्याचे तुम्ही ऐकले असेल, म्हणजेच अन्नपदार्थावाटे रोगप्रसार होतो यालाच अन्नातून विषबाधा असे म्हणतात. माझ्या घाणीवर बसतात. रोगग्रस्त माणसाच्या विष्ठेवर माझ्या बसल्या, की त्यांच्या पायांना आणि शरीराला विष्ठेतील रोगजंतू चिकटतात. याच माझ्या खाद्यपदार्थावर बसतात आणि ते रोगजंतू त्या पदार्थांमध्ये जातात. असे खाद्यपदार्थ खाल्ले, की खाणाऱ्याच्या शरीरात रोगजंतू शिरतात आणि रोगाची लागण होते. म्हणूनच नेहमी झाकलेले, घरगुती, ताजे व गरम अन्न खाणे महत्त्वाचे असते.

कीटकांमार्फत रोगप्रसार

हिवताप झालेल्या रोग्यास विशिष्ट डास चावला, की रोग्याच्या रक्तातील हिवतापाचे जंतू डासाने शोषलेल्या रक्ताबरोबर डासाच्या शरीरात प्रवेश करतात. हा डास दुसऱ्या व्यक्तीला चावला की त्या व्यक्तीच्या शरीरात हिवतापाचे जंतू शिरतात आणि त्या व्यक्तीला हिवतापाची लागण होते. डास, पिसवांसारख्या कीटकांमुळे रोगप्रसार होतो, म्हणूनच अशा कीटकांची पैदास रोखली पाहिजे.

संपर्कामुळे रोगप्रसार

नायटा, खरूज त्वचेवर होणारे रोग आहेत. त्यांचे रोगजंतू त्वचेवर वाढतात. अशा रोग झालेल्या व्यक्तीच्या त्वचेशी स्पर्श झाला किंवा त्याचे कपडे दुसऱ्याने वापरले तर त्यालाही तोच त्वचेचा रोग होऊ शकतो. म्हणूनच एकमेकांचे कपडे वापरणे टाळावे.

सराव करु याः

  1. खाली दिलेल्या रोगांचा प्रसार कोणत्या माध्यमाद्वारे होतो ते शोधा आणि रोगांचे माध्यमानुसार वर्गीकरण करा. (कांजण्या, कॉलरा, सार्स, क्षयरोग, कावीळ, घटसर्प, गोवर, अतिसार, गॅस्ट्रो, टायफॉईड, हिवताप, चिकनगुनिया, डेंग्यू, हत्तीरोग, कोरोना )
  1. तर काय होईल ते सांगा.

अ. पाणी उकळून व गाळून प्यायले.

ब. उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ले.

क. अन्न झाकून ठेवले.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment