इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 34
विषय – इतिहास – भूगोल

पहिले काही आठवूया –
1 त्रियुग पद्धती माहिती आहे.
2 सोने या धातूचा गुणधर्म माहिती आहे.
3 तांबे या धातूचा गुणधर्म माहिती आहे.
4 ताम्रयुग अर्थ सांगता येतो.
करून पाहूयात –
1 नजीकच्या काळात कुंभारकामाचे निरीक्षण कर. कुंभारकामासाठी वापरल्या जाण्याऱ्या चाकाच्या रचनेत कोणकोणते बदल झाले त्याची माहिती मिळव.
2 चाकाचा शोध लागता नसता तर काय झाले असते? किमान पाच ओळी लिही.
अध्ययन अनुभव / कृती
तांब्याच्या वापराचा सुमारे सात हजार वर्षांपूर्वीपासूनचा पुरावा मिळती. ज्या प्रदेशांमध्ये तांबे दुर्मिळ होते, तिथे तांबे मोठ्याप्रमाणावर वापरणे शक्य नव्हते त्यामुळे तांब्याचा उपयोग कसा करायचा हे माहीत असूनही तेथे दगडाची हत्यारे, अवजारे यांचा वापर अधिक होत राहिला. अशा स्थळांच्या उत्खननात तांब्याच्या वस्तू मिळाल्या तरी त्यांचे प्रमाण फार कमी असते. अशा स्थळांना ताम्रयुगीन न म्हणता ताम्रपाषाणयुगीन असे म्हटले जाते. तांबे हे सोन्याच्या तुलनेत कठीण असले, तरी त्यापासून वस्तू बनवण्या च्या दृष्टीने नरमच असते. त्यामध्ये जस्त मिसळले की, त्याला पुरेसा कठीणपणा येतो. तांबे आणि कथिल यांच्या मिश्रधातूला कासे असे म्हणतात. नवाश्मयुगातील माणूस वस्तू बनवण्यासाठी कासे या धातूचा वापर करू लागला, म्हणून त्या काळाला कांस्ययुग असेही म्हणतात. मिश्रधातू बनवण्यासाठी धातू वितळवावे लागतात. जस्त आणि कथिल धातू कसे वितळवयाचे याचे ज्ञान माणसाला कासे बनवण्याच्या सुमारे १००० वर्ष आधीपासून होते.
ताम्रयुगाचा काळ हा नवनव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता. याच काळात लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे चाक. हे सर्वसाधारणपणे मान्य केली जाते की, चाकाचा उपयोग मातीची भांडी घडवणाऱ्या व्यक्तींनी सर्वप्रथम केला.
वाहनासाठी चाकाचा उपयोग त्यानंतर काही काळाने सुरू झाला असावा. वरील चित्रात मातीची भांडी घडवताना चाकाचा वापर कसा केला आहे ते दाखवले आहे.
भांडी चाकावर घडवायला लागल्यानंतर त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य झाले. या काळात सुबक आकारांची आणि सुंदर नक्षीची रंगीत भांडी घडवली जाऊ लागली. ही भांडी इतर विविध वस्तू बनवणारे कुशल कारागीर कामाच्या सोईसाठी गावात एके ठिकाणी वस्ती करू लागले. आपण असे म्हणू शकतो की गावामध्ये कुशल कारागिरांच्या वस्तीचा आणि वस्तूंच्या उत्पादन केंद्राचा एक खास विभागच तयार झाला, परंतु हे ज्या गावांमध्ये कच्चामाल सहज उपलब्ध होत होता आणि जी गावे व्यापाराच्या दृष्टीने अधिक सोयीची होती, त्या गावांमध्येच घडले. त्या गावांचा विस्तार झाला वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर व्यापारातही वाढ झाली. त्यामुळे वाहतुकीच्या पद्धतीत बदल होणे गरजेचे होते. याच काळात चाकांच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली.
काय समजले ?
वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
1 ताम्रयुगात कशाचा शोध लागला?
2 चाकाचा उपयोग सर्वप्रथम कोणी केला?
3 ताम्रयुगात गावांचा विस्तार कसा झाला?
4 वाहतुकीच्या पद्धतीत बदल होणे का गरजेचे होते?