इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 33
विषय – विज्ञान कृतिपत्रिका
कृतिपत्रिका क्रमांक : 20
समजून घेऊया: इंद्रिय संस्था व शरीरातील ऊर्जा.
संदर्भ इयत्ता : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 21. (कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिये )
अध्ययन निष्पत्तीः प्राण्यांमधील असाधारण क्षमता (दृष्टी, गंध, ऐकणे निद्रा, आवाज इत्यादी) व त्यांचे प्रकाश, आवाज व अन्न यांना प्रतिसाद देतात.
लक्षात घेऊया :
इंद्रियसंस्था
अनेक इंद्रिये मिळून श्वासोच्छ्वास घडवून आणतात हे तुम्ही पाहिले. यांपैकी कुठलेही एक इंद्रिय नीट काम करत नसेल, तर श्वासोच्छ्वासाचे काम पूर्ण होणार नाही. शरीराचे एखादे काम एकत्रितरीत्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या अशा गटाला इंद्रियसंस्था म्हणतात. म्हणून नाक, श्वासनलिका, फुप्फुसे आणि श्वासपटल यांना एकत्रितपणे श्वसनसंस्था म्हणतात.
शरीरातील ऊर्जा
श्वसनक्रियेमुळे ऑक्सिजन वायू शरीरातील रक्तात येतो आणि शरीराच्या सर्व भागांत पसरतो. पचनातून तयार झालेले पदार्थही रक्तात मिसळतात व रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागांत पोचतात. त्यांपैकी काही पदार्थ शरीरासाठी इंधनाचे काम करतात. हवेतील ऑक्सिजन रक्ताबरोबर शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहचला, की तेथे पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने मंद ज्वलन होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. हीच ऊर्जा शरीराची सर्व कामे होण्यास उपयुक्त ठरते.
सराव करु याः
- एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ. अस्थी संस्थेचे कार्य कोणते?
ब. मानवी शरीरात कार्यरत असणाऱ्या इंद्रिय संस्थांची नावे लिहा.
क. शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कामात कोणकोणत्या इंद्रियाचा समावेश असतो ?
- खाली काही रोगांची नावे दिली आहेत. हे रोग कोणत्या इंद्रिय संस्थेच्या बिघाडामुळे होतात ते लिहा.

2 विचार करा व लिहा. तुमच्या शरीरातील उर्जा वापरण्यासाठी तुम्ही कोणत्या क्रिया करता?
खाली दिलेल्या आकृतीच्या भागांना नावे द्या.
