इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 33
विषय – इतिहास – भूगोल

थोडे आठवूया ! –
१) तुम्हास माहीत असलेल्या संदेशवहनाची साधनांची नावे लिहा.
2 आपण दूरदर्शन संचावर अनेक कार्यक्रम पाहतो. ते कुठून येतात ?
३) मोबाईलचा वापर कशासाठी केला जातो ?
चित्रांचे निरीक्षण करा चित्रामध्ये दाखवलेल्या चेहऱ्यावरून तुम्हांला कोणते भाव जाणवतात ते चेहऱ्याखालील चौकटीत लिहा.

चेहऱ्यावरील भाव पाहून आपल्याला त्या व्यक्तीच्या भावना समजतात, म्हणजेच चेहऱ्यावरील भाव किंवा इतर हावभावावरून आपल्यापर्यंत संदेश पोहोचती संदेशवहनाद्वारे आपल्याला माहिती मिळते. माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन होय. माहितीचे प्रसारण हादेखील संदेशवहनाचाच भाग आहे.
कृती – २

चित्रांचे निरीक्षण करा. चित्रांत कोणकोणत्या प्रसारमाध्यमांचा वापर केला आहे ते चौकटीत लिहा.
प्रसारमाध्यमांचे चांगले परिणाम
१) आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तींशी सहज संपर्क साधता येतो. वेळ व श्रम यांची बचत होते
२) पर्यावरण, मिळते , स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता इत्यादी बाबतीत संवेदनशीलता वाढण्यास मदत
३) वादळे, त्सुनामी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीबाबत पूर्वकल्पना मिळू शकते. ४) अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य शिक्षण यांबाबतची जाणीवजागृती होते .. ६) प्रसारमाध्यमांमुळे व्यापार, उद्योगधंदे यांमध्ये वाढ होते .
प्रसारमाध्यमांचे हानिकारक परिणाम
१) दूरदर्शन, संगणक, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे तसेच पाठीचे व श्रवणाचे आजार होतात.
२) दूरदर्शन वाहिन्या, इंटरनेट यांद्वारे मिळालेल्या महितीचा दुरुपयोग करून समाजाची शांतता व स्वास्थ्य बिघडवण्याचे प्रकार घडतात.
३) प्रसारमाध्यमांवरील विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवल्याने मैदानी खेळ, शारिरीक क्षमता याकडे दुर्लक्ष होते .
मला हे समजले ! –
उत्तर : ………………………………………….
या प्रश्नांची उत्तरे शोधू
• वृत्तपत्रातून आपल्याला कोणकोणत्या प्रकाराची माहिती मिळते ?
उत्तर : ………………………………………….
पाचव्या इयत्तेत शिकणारा आमोद नेहमी संगणकावर वेगवेगळी संकेतस्थळे पाहतो. टीव्ही वरील कार्यक्रम पाहती. आईच्या मोबाईल वर गेम खेळतो. सारखा घरी बसून असतो. हल्ली त्याला भूक कमी लागते. त्याचे वजनही वाढले आहे.

6. विषय – हिंदी
सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी