इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 41
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास
कृतिपत्रिका : 25
समजून घेऊ या चंद्राच्या कला
: इयत्ता 3 री, पाठ 25- अवतीभवती होणारे बदल. संदर्भ :
अध्ययन निष्पत्ती : विभिन्न स्थान, कृती, वस्तूविषयी आपली निरीक्षणे, अनुभव, माहिती विविध प्रकारांनी नोंदवतात आणि आकृतीबंधाबद्दल भाकीत करतात.
लक्षात घेऊ या :
चंद्र चंद्र आकाशात पाहायला आपल्या सर्वांना आवडतो. चंद्राचा आकार दररोज सारखा असतो का ? चंद्राची उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते. चंद्राचा आकारही दररोज बदललेला दिसतो. तसेच आकाशात चंद्र दररोज एकाच जागी दिसत नाहीत. याचे कारण म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती सतत फिरत असतो.
चंद्राच्या कला

दररोज जे चंद्राचे निरनिराळे आकार दिसतात, त्या आकारांना चंद्राच्या कला म्हणतात. ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. त्यानंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. पंधराव्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही. त्या दिवसाला अमावस्या म्हणतात. अमावस्येनंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग पुन्हा वाढत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल गरगरीत दिसतो.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

Thank you for sharing your info. I truly appreciate your efforts aand I will be waiting for your nnext write ups thank you once
again. https://glassi-india.mystrikingly.com