♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 36

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 36

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास


कृतिपत्रिका 20

संदर्भ इयत्ता 3 री, पाठ 17 सुंदर दात स्वच्छ शरीर. अध्ययन निष्पत्ती : विभिन्न कृती, निरीक्षणे अनुभव, माहिती विविध प्रकारांनी नोंदवतात. लक्षात घेऊ या

आपले दात आपले दात स्वच्छ असतील तर शरीर सुद्धा निरोगी राहते. आपल्या लहानपणी जे दात येतात, त्यांना दुधाचे दात म्हणतात. ते सातव्या आठव्या वर्षी पडतात. त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात. त्या दातांवा कायमचे दात म्हणतात. कायमचे दात पडले की पुन्हा दात येत नाहीत. म्हणून दातांची काळजी घ्यावी.

दातांची स्वच्छता व निगा कशी राखाल? आपण काहीही खाल्ले की चूळ भरून दातांवरून आतून बाहेरून बोट फिरवावे आणि दात व हिरड्या स्वच्छ कराव्यात. नाहीतर आपण खाल्लेले अन्नाचे कण दातांच्या फटींमध्ये अडकतात व ते कुजून तोंडाला घाणेरडा वास येतो. त्यामुळे दात व हिरड्या खराब होतात. दातांची हीच घाण पोटात जाऊन पोटाचे विकार होतात.

हे टाळायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यावर दात घासावेत. त्याच बरोबर जीभ व हिरड्यांचीही स्वच्छता करावी. दात घासण्यासाठी ब्रश व पेस्ट चा वापर करावा. काही जण दात घासण्यासाठी कडुलिंब य बाभळीच्या काड्या वापरतात. काही जण दंतमंजन किंवा घरातील राखुंडी वापरातात, परंतु खरखरीत पदार्थाच्या वापरामुळे दातांचे आवरण व हिरड्यांना इजा होऊ शकते.

सराव करू या :

  1. सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्वाचे असते, याचे कारण काय असेल?
  2. कायमचे दात आल्यानंतर दातांची अधिक काळजी घेणे का गरजेचे आहे ?
  3. दात घासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी काय वापरता ?

कृती

आरशासमोर उभे राहूब मोठा ‘आ’ करून आपल्या दातांचे निरीक्षण करा. तुमचे दात पिवळे किंवा काळे पडले असतील तर समजा की, तुम्ही दातांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे हि निरोगी दातांसाठी फार चांगली सवय आहे. तसेच दात घासण्यासाठी ब्रश व पेस्ट यांचाच वापर करावा. दातांच्या आरोग्यासाठी आणखी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते ?


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी