इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 42
विषय – इतिहास – भूगोल

पहिले काही आठवूया
- संस्कृती अर्थ माहिती आहे.
- नवाश्मयुगीन संस्कृतींचा विकास कसा झाला, माहिती आहे.
- नागरी संस्कृती कशा उदयाला आल्या, हे माहिती आहे.
करून पाहूयात
1 विविध पारंपारिक खेळांची माहिती मिळव.
अध्ययन अनुभव / कृती
मागील पाठात विविध नागरी संस्कृतीसोबत हडप्पा संस्कृतीची माहिती पहिली. या पाठात हडप्पा संस्कृतीची इतर वैशिष्ट्ये पाहू.
मातीची पक्की भाजलेली, खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. या भांड्यांचा रंग लाल असुन त्यावर पिंपळपान, माशांचे खवले यांसारख्या आकृतीची सुबक नक्षी काढत. विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. त्या वस्तूंना मेसोपोटेमिया खूप मागणी होती. हडप्पा संस्कृतीतील देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावेत असे तिथे मिळालेल्या मातीच्या मूर्ती आणि मुद्रा यांच्या आधारे मानले जाते.

प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळ आणि मनोरंजनाची विविध प्रकार होते. त्यामध्ये प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती हे दोन प्रकार होते. त्या खेरीज पट आणि सोंगट्यांचे खेळही खेळले जात. प्राचीन इजिप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ लोकप्रिय होता. प्राचीन चीनमध्येही पट आणि सोंगव्या घेऊन खेळण्याची विविध प्रकार होते. मेसोपोटेमिया आणि हडप्पा संस्कृती मध्ये पट आणि त्यांचे खेळ लोकप्रिय होते.
हडप्पा संस्कृतीच्या काही स्थळांच्या उत्खननांमध्ये मुलांची विविध प्रकारची खेळणी मिळालेली आहेत. त्या खेळण्यांमध्ये मातीच्या भिंगया, खुळखुळे, बैलगाड्या चाकांवरचे प्राणी व पक्षी यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. सध्याच्या काळातील खेळणी व नागरी संस्कृतीतील खेळणी यांची तुलना कर. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळांप्रमाणेच संगीत आणि नृत्य यांनाही खूप महत्त्व होते. कोणत्याही उत्सवप्रसंगी संगीत आणि नृत्य यांचे आयोजन आवश्यक असे. त्याकाळी अनेक प्रकारची वाद्ये वापरात होती. ‘बालाग’ नावाचे एक तंतुवाद्य मेसोपोटेमियात प्रचलित होते.

सारंगी हे ही एक प्राचीन तंतुवाय आहे. त्याखेरीज झांजा, खुळखुळे, बासरी, डोल अशी अनेक प्रकारची वाचे वाजवली जात असत. इजिप्तच्या राजांना फॅरो असे म्हणत. विशेष उत्सवप्रसंगी स्वतः फॅरोसुद्धा नृत्यामध्ये सहभागी होत असे. हडप्पा संस्कृतीमध्ये नृत्याला विशेष महत्त्व होते, असे अनुमान मोहेंजोदडो येथील उत्खननात मिळालेल्या नर्तिकेच्या कांस्यमूर्तीच्या आधारे करता येते.
काय समजले ?
वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये मनोरंजन कसे करत?
२. हडप्पा संस्कृतीत कोणाची देवतांची पूजा करत?
३. हडप्पा संस्कृतीमधील मुलांची खेळणी कोणती होती?
४. प्राचीन नागरी संस्कृतीमधील वाद्यांची नावे लिही.