इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 26

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस  26

विषय  – इतिहास – भूगोल  


करून पाहूयात

1 एखादा पाळीव प्राणी ( गाय, शेळी, कुत्रा, मांजर पैकी कोणताही प्राणी) पाळताना तु काय करशील ते थोडक्यात लिही.

2 शेती करताना कोणत्या पाळीव प्राण्यांचा उपयोग होतो, ते लिही.

वरील चित्र हे पाठ क्र. ०६ मधील आहे. या चित्रात असे लक्षात येते कि, प्राणी व मानव सोबत राहू लागले आहेत. परंतु प्राणी मानवासोबत राहणे सहज शक्य नव्हते त्या काळात आत्तापेक्षा खूप हिंस्त्र व आकाराने मोठे प्राणी होते तरीही बुद्धिमान मानवाने पशुपालनाची सुरुवात केली. सध्या तर पशुपालनात प्रचंड प्रमाणात प्रगती झाली आहे. सध्या तर पशुपालन हा व्यवसाय आढळतो. पशुपालन करताना प्राणी माणसाळविण्याच्या तीन मुख्य पायऱ्या आहेत.

१. रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे.

२. त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे.

३. त्यांच्यापासून दूध दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे कर घेणे. यातील तिसरी पायरी माणूस जेव्हा साध्य करतो तेव्हा त्याला पशुपालन असे म्हणतात. येथे आपण बैलाचे उदाहरण पाहू.

वरील चित्रात रानबैल आहे. बुद्धिमान मानवाने रानबैलांना माणसाळविण्यासाठी प्रथम पकडले. दुसऱ्या पायरीत रानबैलाला माणसासोबत राहण्याचे वळण लावले कारण बैलालाही लक्षात येते कि, माणसासोबत राहिल्याने त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे हळूहळू रानबैलही माणसाच्या कृतींना प्रतिसाद द्यायला सुरुवात करतो व तिसऱ्या पायरीत मानव रानबैलाकडून कष्टाची कामे करून घ्यायला सुरुवात करतो. हेच तंत्र वापरून मानवाने कुत्री, शेळ्या-मेंढ्या, गाय, बैल, म्हैस माणसाळवले. त्यांचा विविध ठिकाणी उपयोग करायला सुरुवात केली. उदा. शेती..

शेतीचे सुमारे ११ हजार वर्षांपूर्वीची पुरावे प्रथम इस्राईल आणि इराक येथे मिळाले आहेत. शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय स्त्रियांना दिले जाते. स्त्रिया काठीच्या आधाराने पेरण्याचे काम करत असाव्यात. काही आदिवासी जमातींमध्ये स्त्रिया अजूनही अशा पद्धतीने पेरणी करतात. पेरणी करण्यासाठी वापरण्याच्या टोकदार काठीला पुरेसे वजन मिळवून जमिनीत खोलवर करता यावे, म्हणून त्या काठ्यांना मधोमध छिद्र असलेले दगड बसवले जातात.

वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.

………………………………………………………………………..

………………………………………………………………………..

………………………………………………………………………..

………………………………………………………………………..

पशुपालनाची आवश्यकता का आहे?

प्राणी माणसाळविण्याच्या तीन मुख्य पायया कोणत्या? नवाश्मयुगात शेतीची सुरुवात कशी झाली?

नवाश्मयुगात कृषिप्रधान समाजव्यवस्था कशी अस्तित्वात आली?

अधिक सराव करु –

१. नवाश्मयुगात शेतीसाठी मानवाने प्राण्यांचा वापर कसा केला असेल?


5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment