coronavirus : Fact Check: करोना हॉस्पिटलच्या नावांच्या यादीचा व्हायरल मेसेज खोटा – fact check: fake list viral of maharashtra hospital blood test coronavirus

[ad_1]

करोना व्हायरसची भीती आता संपूर्ण राज्यात पसरली आहे. याचा गैरफायदा घेत काही समाज विघातक कृत्य करणाऱ्यांना राज्यातील हॉस्पिटलची यादी प्रसिद्ध केली आहे. या खोट्या मेसेजमधून करोना रक्त तपासणी राज्यातील या हॉस्पिटलमध्ये केली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु, आरोग्य विभागाने याबाबत तत्काळ खुलासा केला आहे. करोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी व्हायरल होत असलेल्या मेसेज बाबत आरोग्य विभागाकडून महत्वाचा खुलासा करण्यात आला आहे.


कशी केली पडताळणी?

सोशल मीडियावर फिरत असलेला मेसेज खोटा असून या मेसेज संदर्भात आरोग्य विभागाने ट्विट करून याची माहिती दिली आहे. नागरिकांनी या खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.

राज्यात संशयित रुग्णांची करोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव ( ‘नसो फैरिंजीयल स्वाब’ ) घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या ३ ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात. अजून काही दिवसात ही सुविधा केईएम रुग्णालय, मुंबई, हाफकीन यांच्यासह चार ते पाच ठिकाणी वाढविण्यात येणार आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर सध्या करोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.


निष्कर्ष

करोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी व्हायरल होत असलेला मेसेज खोटा असल्याचे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

fact check: बँकेतून पैसे काढण्यासाठी NPR ची कागदपत्रे लागणार?

fake alert: करोनामुळे देशातील ४ राज्यात सुट्टी जाहीर?



[ad_2]

Source link

Leave a comment