coronavirus : करोनाः व्हॉट्सअॅपवर मिळणार सर्व प्रश्नांची उत्तरं – coronavirus: ncov is a whatsapp helpline to answer your covid-19 queries

[ad_1]

नवी दिल्लीः जागतिक आरोग्य संगठनेने करोना व्हायरसला महामारी घोषित केले आहे. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरात आलेल्या करोना व्हायरसमुळे आतापर्यंत १,२१,००० लोकांना संसर्ग झाला आहे. तर ४३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे करोना व्हायरसमुळे प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा वेळी काही चुकीच्या बातम्याही पसरवल्या जात आहे. चुकीच्या बातम्यांना आळा घालण्यासाठी हॅप्टिक कंपनीने करोना व्हायरसच्या माहितीसाठी एक व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणला आहे.

चॅटबॉटचा वापर करण्यासाठी युजर्सला 9321298773 या नंबरवर मेसेज करावा लागणार आहे. या नंबरवर मेसेज केल्यानंतर युजर्संना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहे. बेसिक माहिती चॅट बॉट वर दिली जात आरहे. यात बेसिक हायजिन स्टँडर्ड, करोना व्हायरसचे लक्षणे आदी माहितीचा यात समावेश असणार आहे. या चॅट बॉटचा उद्देश लोकांना करोना व्हायरस संबंधीची खरी माहिती देण्याचा आहे. तसेच करोना व्हायरस संबंधी चुकीची माहिती अफवा दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. चॅटबॉट च्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर लिहिले की, नोवल करोना व्हायरस संबंधीची माहिती चॅटबॉट देणार आहे.

करोनाः हात धुवाच पण, मोबाइलही स्वच्छ ठेवा

करोना व्हायरसच्या भीतीपोटी भारतीय सरकारने १५ एप्रिल २०२० पर्यंतचे सर्व व्हिजा रद्द केले आहेत. आजपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु, डिप्लोमॅटिक, अधिकारी, यूएन आणि आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन, इम्प्लॉयमेंट प्रोजेक्ट व्हिसा रद्द करण्यात आलेला नाही. तसेच विदेशातून भारतात येणाऱ्या एअरलाइन्स कमी करण्याचाही सरकार विचार करीत आहे. आता पर्यंत करोना व्हायरसचे एकूण ७५ जणांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Realme 6 Pro चा आज पहिला सेल

कोण बेस्टः ‘रेडमी नोट ९ प्रो’ Vs ‘रियलमी ६ प्रो’



[ad_2]

Source link

4 thoughts on “coronavirus : करोनाः व्हॉट्सअॅपवर मिळणार सर्व प्रश्नांची उत्तरं – coronavirus: ncov is a whatsapp helpline to answer your covid-19 queries”

Leave a comment