[ad_1]
नवी दिल्ली : Electric vehicles charging stations: इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिग स्टेशनची संख्या वाढवण्याची योजना असून याअंतर्गत पुढील वर्षापर्यंत चार्जिग स्टेशनची संख्या ७०० पर्यंत करण्यात येणार आहे. टाटा पॉवरचे (TATA Power) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी याबाबत माहिती दिली. कंपनीने आधीच वाहनं वेगाने चार्ज करणारी १०० स्टेशन स्थापित केली आहेत. दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, पुणे, हैदराबाद अशा शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन सुरु करण्यात सुरु करण्यात आली आहेत. मार्च २०२० पर्यंत याची संख्या ३०० पर्यंत करण्याची कंपनीची योजना आहे.
सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या शहरांत इलेक्ट्रिक वाहन सुरु करण्यात आली आहेत, त्या शहरांत चार्जिंग स्टेशन लावण्यात येत आहेत. पुढील वर्षापर्यंत याची संख्या वाढवून जवळपास ७०० पर्यंत करण्याचा मानस आहे. सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांसाठी जीएसटी दर १२ टक्क्यांनी कमी करुन तो ५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा खर्च कमी होईल आणि लोक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित होऊ शकतात.
कंपनी केवळ सार्वजनिक ठिकाणांवर लक्षकेंद्रीत करत नसून, घरांमध्येही चार्जिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध करत आहेत. ‘पीटीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, सिन्हा यांनी, आम्ही सार्वजनिक ठिकाणांसोबत घरांमध्येही चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणार असल्याचं सांगितलं.
सार्वजनिक ठिकाणांमध्ये मेट्रो स्टेशन, शॉपिंग मॉल, चित्रपटगृह आणि महामार्गांचा समावेश आहे. कंपनी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन लावण्यासाठी मेट्रो रेल प्राधिकरण आणि महानगरपालिकांसोबत चर्चा करत आहे. याशिवाय टायटन वॉच शोरुम, वेस्टसाइट आणि क्रोमा यांसारख्या टाटा समूहांच्या दुकानांत चार्जिंग स्टेशन सुरु करणार आहे.
टाटा पॉवरने, एचपीसीएल (HPCL), आयओसीएल (OICL) आणि आयजीएसच्या (IGS) दुकानात व्यावसायिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा करार झाला असल्याचं सांगितलं आहे. कंपनीने मुंबईत ३० चार्जिंग स्टेशन स्थापित केले आहेत. आणि पुढील वर्षापर्यंत याची संख्या वाढवून २०० पर्यंत करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.
[ad_2]
Source link