itel vision 1 : आयटेलचा स्मार्टफोन लाँच, किंमत ५,४९९ ₹ – itel vision 1 with 4,000mah battery, dual cameras launched, priced at rs 5,499

[ad_1]

नवी दिल्लीः आयटेलने भारतात आपला नवा स्मार्टफोन Itel Vision 1 लाँच केला आहे. या फोनमध्ये एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये रियर कॅमेऱ्याची डिझाईन आयफोन ११ सारखी देण्यात आली आहे. आयटेलच्या या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे.

Itel Vision 1 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे. तसेच फोनमध्ये अँड्रॉयड पाय ९.० आहे. फोनमध्ये ६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला असून त्याचे रिझॉल्यूशन ७२०X१५६० पिक्सल आहे. फोनमध्ये युनिसॉकचे ऑपरेटर प्रोसेसर आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या साहायाने हा स्टोरेज १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. यात एक ८ मेगापिक्सलचा तर दुसरा लेन्स ०.०८ मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स आहे. कॅमेऱ्याची डिझाईन आयफोन ११ सारखी आहे. रियर कॅमेऱ्यात फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

आयटेलने या स्वस्त फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये मागच्या बाजुला फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. तसेच फोनमध्ये फेस अनलॉक दिला आहे. फोनसोबत ७९९ रुपयांचा ब्लूटूथ हेडफोन फ्री मिळणार आहे. या फोनची किंमत ५ हजार ४९९ रुपये आहे. या फोनची विक्री रिटेल स्टोरमधून सुरू करण्यात आली आहे. फोनसोबत जिओकडून २२०० रुपयांचा कॅशबॅक आणि २५ जीबी अतिरिक्त डेटा देण्यात येणार आहे. हा फोन ग्रेडिएशन ब्लू आणि ग्रेडिएशन पर्पल या दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.

गुगलने Play Store मधून ‘हे’ २४ अॅप्स हटवले

एअरटेल ग्राहकांना झटका; ‘या’ प्लानमध्ये दरवाढ

जपानने करोनाग्रस्तांना वाटले २ हजार आयफोन



[ad_2]

Source link

Leave a comment