realme x50 pro : Realme X50 Pro: भारताचा पहिला 5G स्मार्टफोन २४ ला लाँच होणार – india’s first 5g smartphone realme x50 pro 5g launch on 24 february

[ad_1]

नवी दिल्लीः जगातील सर्वात मोठा टेक कार्यक्रम मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) ला करोना व्हायरसच्या भीतीमुळे पुढे ढकलले आहे. हा कार्यक्रम बार्सिलोनामध्ये २४ फेब्रुवारीला पार पडणार होता. परंतु, हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने आपला स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केलेल्या कंपन्यांनी आता बदल करण्यास सुरुवात केली आहे. चीनची स्मार्टफोन बनवणारी कंपनी रियलमी आपला पहिला 5G स्मार्टफोन Realme X50 Pro भारतात २४ फेब्रुवारीला लाँच करणार आहे. हा फोन भारतातील पहिला 5G स्मार्टफोन असणार आहे.

याआधी कंपनी या फोनला MWC मध्ये लाँच करणार होती. हा फोन भारतातील पहिला 5G स्मार्टफोन असला तरी भारतात ५ जी कनेक्टिविटी सुरू होण्यास अजून बराच वेळ लागणार आहे. फोनची लाँचिंग नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासंदर्भातील निमंत्रण मीडियांना पाठवण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या फ्लॅगशीप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८६५ सह देण्यात येणार आहे. तसेच या फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत UFS 3.0 स्टोरेज दिला जाणार आहे. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. फोनमध्ये ६५ वॅटची सुपर डर्ट चार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

या फोनमध्ये ६ कॅमेरे असल्याचे सांगण्यात येत आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या टीझरवरून यात ड्युअल सेल्फी कॅमेरा असणार आहे. रियलमी एक्स२ प्रो मध्ये २०एक्स हायब्रिड झूम फीचर दिले जाण्याची शक्यता आहे.

Daiwa चे दोन स्मार्ट टीव्ही भारतात लाँच

गुगलने Play Store मधून ‘हे’ २४ अॅप्स हटवले

आयटेलचा स्मार्टफोन लाँच, किंमत ५,४९९ ₹



[ad_2]

Source link

Leave a comment