[ad_1]
अक्षय घुगे, झी मिडिया, मुंबई : भारतीय बाजारात आता ट्रायम्फ कंपनीची रॉकेट-थ्री नावाची एक सुपरबाईक आली आहे. या बाईकला दोन कारच्या ताकदीएवढं इंजिन लावण्यात आलं आहे. अवघ्या काही सेकंदात ही बाईक वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावू लागते. ही बाईक गुळगुळीत हायवेवर आणि ओबडधोबड रस्त्यांवरही चालवू शकता. ओबडधोबड रस्त्यांवर चालवण्यासाठी बाईकमध्ये काही स्पेशल फिचर्स देण्यात आले आहेत. शिवाय टायरमधील हवेच्या दाबाची माहितीही डिस्प्लेवर मिळते. बाईक चालवण्यासाठी चार रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत.
अनेक भारतीयांना रेसिंग बाईकचं वेड असतं. बाईक पाहताना पहिला प्रश्न असतो बाईक किती सीसीची आहे. भारतीय बाजारात फार तर पाचशे सीसीच्या बाईक्स उपलब्ध आहेत. पण आता ज्यांना वेगाचा थरार अनुभवायचा आहे अशा बाईकप्रेमींसाठी ट्रायम्फची रॉकेट-थ्री नावाची बाईक बाजारात आली आहे.
The new Rocket 3’s distinctive three-header exhaust run, contributes to the signature deep growling triple soundtrack. https://t.co/wx9UghGXgk#Rocket3 #TheBigTriple #ForTheRide #TriumphIndia pic.twitter.com/3NzpTqvHwf
— TriumphIndiaOfficial (@IndiaTriumph) December 13, 2019
The all new 2500cc Rocket 3 triple power plant, is boasting thrilling performance at 167PS peak power & 221Nm peak torque.
Find out more: https://t.co/sOCBvDCYdd#TriumphOfficial #ForTheRide #Triumph #Rocket3 pic.twitter.com/Ud0w9VLUEx
— TriumphIndiaOfficial (@IndiaTriumph) December 12, 2019
ब्रिटेनमधील कंपनी ट्रायम्फ मोटरसायकलने भारतात Rocket 3 Bike लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत जवळपास १८ लाख रुपये इतकी आहे. २०२० ट्रायम्फ रॉकेट ३ बाईक जागतिक पातळीवर ROcket 3 R आणि ROcket 3 GT या दोन वेरिएन्टमध्ये आहे. भारतीय बाजारात सध्या रॉकेट-थ्रीचा आर व्हेरियंट दाखल झाला आहे.
या बाईकचं इंजिन दोन कारच्या क्षमतेएवढं आहे. बाईकमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. भारतातील सेदान क्लासच्या कार बाराशे सीसीपर्यंत असतात. रॉकेट-थ्रीचं इंजिन २५०० सीसीचं आहे. बाईकच्या इंजिनचे अनेक पार्ट मजबूत ऍल्युमिनिअमचे आहेत. त्यामुळं पूर्वीच्या ट्रायम्फ बाईकपेक्षा रॉकेट-३ बाईकचं वजन ४० किलोनं कमी झालं आहे. रॉकेट-थ्रीचा स्टाईल आणि लूक यावर विशेष काम केलंय. त्यामुळं ही बाईक वेगवान आणि ताकदवान झाली आहे.
The all-new Triumph Rocket 3 R – The ultimate high performance muscle roadster. Featuring an all-new 2500cc triple engine – the biggest production motorcycle engine in the world & with truly imposing muscular presence & magnificent style. https://t.co/EgK636qpVc#ForTheRide pic.twitter.com/mYIWSdxWYQ
— TriumphIndiaOfficial (@IndiaTriumph) December 11, 2019
भारतात बाईकवेडे कमी नाहीत, अडीच हजार सीसीची बाईक ज्या रस्त्यावरुन जाईल तेव्हा लोकांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतील यात शंका नाही.
[ad_2]
Source link