[ad_1]
Galaxy A70s चा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजचा फोन काही महिन्यापूर्वी लाँच करण्यात आला होता. त्यावेळी या फोनची किंमत २८ हजार ९९९ रुपये होती. परंतु, आता ती २६ हजार ९९९ रुपये इतकी करण्यात आली आहे. ८ जीबी रॅम फोनची किंमत आता २८ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या आधी या फोनची किंमत ३० हजार ९९९ रुपये होती. सॅमसंग कंपनी लवकरच Galaxy A71 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये असण्याची शक्यता आहे. Galaxy A71 हा स्मार्टफोन आधीचा स्मार्टफोन Galaxy A70s सारखाच असणार आहे. यात स्नॅपड्रॅगन 730G चिपसेट देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट आतापर्यंत समोर आली नाही.
Galaxy A70s या फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रिझॉल्युशन सह ६.७ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह असलेल्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६७५ एसओसी प्रोसेसर असणार आहे. ऑपरेटिंग सिस्टमचा विचार केल्यास यात अँड्रॉयड ९ पाय वर सॅमसंगचा OneUI देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सह एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल शूटर आणि एक ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ४५०० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगसाठी २५ वॅटचा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
करोना व्हायरसमुळे Apple ला मोठे नुकसान
लाँच होण्याआधीच विराट वापरतोय ‘हा’ मोबाइल
[ad_2]
Source link